दुधीची बर्फी तुम्ही किती दिवस खाऊ शकता?

दुधीची बर्फी तुम्ही किती दिवस खाऊ शकता?

दुधीचा हलवा किंवा बर्फी कोणाला आवडच नाही. परंतु देशातील विविध ठिकाणी याची रेसिपी तयार केली जाते. खरंतर दुधीची बर्फी खास आहे. कारण मधुमेह ते पोटासंबंधित समस्यांवर फायदेशीर आहे. खरंतर दुधीत काही खास तत्व असतात. जसे की, फायबर, अँन्टिऑक्सिडेंट आणि अन्य काही. परंतु जेव्हा बर्फी बद्दल बोलले जाते तेव्हा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की, दुधीची बर्फी किती दिवसांपर्यंत तुम्ही ठेवू शकता. याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

दुधीची बर्फी किती दिवस ठेवू शकता?
जर तुम्ही खवा वापरुन दुधीची बर्फी तयार केली असेल आणि ती अगदी सुकलेली असेल तर तुम्ही ७-१० दिवसांपर्यंत फ्रीज मध्ये ठेवू शकता. तसेच या दोन गोष्टींसह दूध आणि ड्राय फ्रुट्स वापरुन बर्फी तयार केली असेल तर ती तुम्ही १५ दिवसांपर्यंत ठेवू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही दुधीची बर्फी जर थोडी ओलसर असेल तर तुम्ही ती २-३ दिवसात संपवली पाहिजे. कारण अशी बर्फी अधिक दिवस ठेवल्यास खराब होण्याची शक्यता असते. त्याचसोबत लक्षात ठेवा की, बर्फी ही बटर पेपर अथवा काचेच्या भांड्यात ठेवू शकता.

तसेच मधुमेह असलेले रुग्ण सुद्धा याची बर्फी खाऊ शकतात. परंतु त्याच्या रेसिपीत थोडासा बदल तुम्हाला करावा लागेल. जसे की, साखर अधिक वापरण्याऐवजी त्यात खजूरचा वापर करु शकता. खरंतर दुधीची बर्फी तुम्ही उपवासाच्या दिवसात ही खाऊ शकता.

 


हेही वाचा- वजन कमी करण्यासाठी एक मुठ मखाने आहेत फायदेशीर

First Published on: April 23, 2023 3:22 PM
Exit mobile version