स्वयंपाकातील अडचणींवर करूया मात

स्वयंपाकातील अडचणींवर करूया मात

kitchen tips

थंडीच्या दिवसात आंबोळ्यांचं पीठ न येणे, भरीतासाठी वांगी चांगली भाजली न जाणे, पावसाळ्यात मीठाला पाणी सुटणे या आणि अशा बर्‍याच स्वयंपाकातील गोष्टींमुळे महिलांचा स्वयंपाक करताना हिरमोड होतो. या लहान-सहान गोष्टींवर मात करून स्वयंपाक बनविण्याचा आनंद लुटण्यासाठी खालील उपाय फायदेशीर ठरतील.

जवळपास सर्वांच्या घरी चहाचे वेगळे पातेले असते. एकसारखा त्याच पातेल्यात चहा केल्याने पातेल्यावर चहाचे डाग दिसतात. चहाचे पातेले धुण्यापूर्वी ते मीठाने चोळल्यास डाग नाहीसे होतात.

शेंगदाणे भाजण्यापूर्वी त्यांच्यावर पाण्याचा ओला हात फिरवावा. शेंगदाणे खमंग भाजले जातात.

खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ घालू नये. नाहीतर दूध फाटते.

अनेकदा कूकरमध्येही तूर डाळ व्यवस्थित शिजत नाही. अशावेळी डाळ शिजवताना त्यात हिंग व हळद घालावी. डाळही व्यवस्थित शिजते. तसेच डाळीला स्वादही येतो.

पालक न शिजवता मिक्सरमधून काढून तसाच फोडणीला द्यावा. त्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो.

भाकरीच्या पीठाला फार दिवस झाले असल्यास भाकरी करताना तुटते. अशावेळी गरम पाण्यात पीठ मळून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी तुटत नाही.

पावसाळ्यात मीठाला पाणी सुटण्याची शक्यता असते. अशावेळी मीठाच्या बरणीवर टीप कागद ठेवून झाकण लावावे.

थंडीच्या दिवसांमध्ये आंबोळ्यांचे पीठ येण्यासाठी पीठ मिक्सरमध्ये ग्राईंड करताना त्यात थोडे गरम पाणी घालावे.

First Published on: February 3, 2019 4:26 AM
Exit mobile version