पिवळ पडलेलं मोबाईल कव्हर असं करा चकाचक

पिवळ पडलेलं मोबाईल कव्हर असं करा चकाचक

तुमच्या मोबाईलचे पांढरे कव्हर दिसायला सुंदर दिसते. पण, ते लवकर पिवळ पडते. प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन मोबाईल कव्हर खरेदी करण्याचा वेळ नसतो. यावेळी तुम्ही घरगुती वस्तुंचा वापर करून सोप्या पद्धतीने मोबाईल कव्हर स्वच्छ करू शकता. तुमच्या मोबाईलचे पिवळे पडलेले कव्हर कसे पांढरे करावे. यासाठी काही टीप्स सांगणार आहोत.

डिश सोपने स्वच्छ करा

 

कोमट पाण्यात डिश सोप टाकून मिक्स करा आणि यानंतर तुमचा मोबाईल कव्हर या पाण्यात टाकून काही वेळासाठी ठेवून द्यावा. यानंतर तुम्ही ब्रशच्या मदतीने मोबाईल कव्हर स्वच्छ करा.

व्हिनेगर

व्हिनेगरच्या वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल कव्हर स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची एक पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट कव्हरला लावून ब्रशने घासून ते स्वच्छ करा.

बेकिंग सोडा

पिवळा झालेला मोबाईल कव्हर स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. बेकिंग सोड आणि पाण्याची एक पेस्ट तयार करून ही मोबाईल कव्हरला लावा आणि नंतर ते स्वच्छ करून घ्या.

रबिंग अल्कोहल

रबिंग अल्कोहलच्या मदतीने पिवळे पडलेले मोबाईल कव्हर स्वच्छ करू शकता. या रबिंग अल्कोहलने मोबाईल कव्हर चांगले स्वच्छ होते. रबिनंग अल्कोहल मोबाईल कव्हर शिंपडा आणि काही वेळासाठी तसेच ठेवा. यानंतर मोबाईल कव्हर स्वच्छ करून घ्या.

टूथपेस्ट

टूथपेस्टने सुद्धा मोबाईलचे पिवळे पडलेले कव्हर स्वच्छ करता येतात. यासाठी तुम्ही टूथपेस्ट मोबाईल कव्हरला लावा आणि ब्रशने ते स्वच्छ करून घ्या.

या गोष्टी लक्षात ठेवा

तुमच्या मोबाईलचे कव्हर पिवळे पडू नये म्हणून तुम्ही ते दररोज क्लीनरने स्वच्छ करा किंवा पाण्याने देखील कव्हर स्वच्छ करू शकता. मोबाईल कव्हर हे अल्ट्रावायलेट रेजमुळे मोबाईलचे कव्हर पिवळे पडते.


हेही वाचा – एकत्र जेवल्याने कुटुंबात वाढते प्रेम

First Published on: July 7, 2023 2:45 PM
Exit mobile version