आंबा पिकलेला आहे की केमिकलने पिकवलेला कसे ओळखाल?

आंबा पिकलेला आहे की केमिकलने पिकवलेला कसे ओळखाल?

उन्हाळा सुरु होताच फळांचा राजा सर्वत्र दिसू लागतो. अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वानाच आंब्याची चव आवडते. या हंगामात आंब्याला वाढती मागणी असते. त्यामुळे अनेकजण नफा मिळविण्याच्या हव्यासापोटी केमिकल पद्धतीने आंबे पिकवून बाजारात विकतात. असे आंबे खाल्याने शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होते. त्यामुळे आंबा खरेदी करताना तो केमिकलने पिकवलेला नसावा. त्यामुळे आंबा केमिकलने पिकवलेला आहे का नाही हे कसे ओळखायचे याच्या सोप्या टिप्स आज आपण पाहुयात,

केमिकलने पिकवलेला कसा ओळखाल?

आंब्याचा आकार –

आंब्याचा आकारावरून आंबा केमिकलने पिकवलेला आंबा आहे का नाही, हे ओळखता येते. केमिकल पद्धतीने पिकवलेले आंबे अत्यंत लहान आकाराचे असतात.

पाण्याचा वापर –

आंबा ओळखण्यासाठी तो पाण्याच्या बादलीत टाकून बुडत आहे का नाही ते तपासा. जर आंबा पाण्याच्या तळाशी जात असेल तर आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे हे समजा आणि जर पाण्यात आंबे तरंगत असतील तर आंबे केमिकलपद्धतीने पिकवलेले आहेत असे समजा.

शरीरावर झालेला परिणाम –

केमिकल पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्याने तोंडात जळजळ होऊ शकते. तसेच पोटदुखी, जुलाब आणि उलट्या यासारख्या तक्रारी जाणवू शकतात.

रसाने ओळखा –

यासाठी आंबा कापून घ्या. कापताना जर आंब्यातून रस टपकत असेल तर आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे असे समजा कारण केमिकलने पिकवलेल्या आंब्याला अजिबात रस नसतो.

दाबून तपासा –

आंबे खरेदी करताना हलके दाबून ते तपासून घ्या. आंबा मऊ असेल तर तो पिकलेला आहे. पण, जर आंबा दाबल्यावर एखाद्या ठिकाणी कडक वाटत असेल तर आंबा नीट पिकलेला नाही तो केमिकलने पिकवलेला आहे. असे समजावे.

आंब्याचा रंग –

केमिकल पद्धतीने पिकवलेल्या आंब्यावर हिरवे डाग असतात आणि तो इतर आंब्यांपेक्षा वेगळा असतो.

 

 

 

 


हेही पहा : Mango And Diabetes : आंब्यामुळे डायबिटीस होतो ?

 

Edited By – Chaitali Shinde

First Published on: April 26, 2024 12:11 PM
Exit mobile version