केळीत असलेले औषधी गुणधर्म

केळीत असलेले औषधी गुणधर्म

banana

भारतात वर्षभर केळं मिळतं. पिकलेल्या केळ्यापेक्षा कच्चं केळं जास्त औषधी असतं. प्राचीन काळापासून आयुर्वेदात पेप्टिक अल्सरच्या इलाजासाठी हिरव्या कच्च्या केऴयाचा वापर होताना दिसतो. कच्चं केळं खाणं सोपं नसल्यामुळे ते उकडून खाणं योग्य ठरेल. कच्च्या केळ्यात विशिष्ट प्रकारचं डाएटरी फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि स्टार्च असतात.

*कच्च्या केळ्यात व्हिटॅमिन बी ६चं प्रमाण जास्त असतं. एक कप उकडलेल्या केळ्यात ३९ टक्के व्हिटॅमिन बी ६ असतं.

*कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनानं हिमोग्लोबिनची मात्रा वाढते आणि अँनिमियाग्रस्त रुग्णांना फायदा होतो.

*हे केळं टॉनिकचं काम करतं. स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कच्च्या केळ्यातील ट्रिप्टोफेम नामक तत्त्व तणाव कमी करण्यास मदत करतं.

*याचबरोबर अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठीही याची मदत होते.

*कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने डायबेटिक तथा अल्सरवर नियंत्रण राहतं. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्याचाही आरोग्याला फायदा होतो.

First Published on: December 14, 2018 4:58 AM
Exit mobile version