चमचमीत मेथीचे मुठीए

चमचमीत मेथीचे मुठीए

चमचमीत मेथीचे मुठीए

बऱ्याचदा मेथीची भाजी खाण्यासाठी लहान मुलांकडून नकार दिला जातो. मात्र, तिच मेथी जर एका वेगळ्या प्रकारे मुलांना खाऊ दिली तर मुले देखील आनंदाने खातील. यासाठीच आम्ही खास तुमच्यासाठी मेथीचे मुठीए ही रेसिपी घेऊन आलो आहोत. चला पाहूया चमचमीत मेथीचे मुठीए कसे बनवायचे?

साहित्य

एक मेथीची जुडी
धणे
जिरे
ओवा
बडीशेप
खसखस अंदाजे भाजून
जाडसर तीळ
चिचेचा कोळ
गूळ
हिरव्या मिरच्या ३
लसूण पाकळ्या २/३ वाटून
अर्धी वाटी रवा
बेसन
चिमूटभर सोडा
तळण्यासाठी तेल

कृती

भाजी नीट करून फक्त पाने घ्यावीत आणि स्वच्छ धुवून बारीक चिरावीत. त्यात मसाला पूड, गूळ, चिचेचा कोळ, लसूण मिरची वाटण, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे. नंतर रवा आणि बेसन पीठ एकत्र करावे. त्यात सोडा आणि तापलेल्या तेलाचे मोहन घालून पीठ हाताने चोळून घ्यावे. मग भाजीचे मिश्रण आणि पीठ एकत्र करावे आणि घट्ट भिजवावे. पाणी घालू नये. भाजीत बसेल एवढे बेसन घालावे. चांगले मळून घेऊन लांबट गोळे करून मंद गॅसवर लालसर होईपर्यंत तळावे. या साहित्यात मेथी मुठिया प्रमाणेच कोबी, दुधी, गाजर अशा भाज्या किसून घालूनही मुठिया छान होतात.

First Published on: February 19, 2020 6:30 AM
Exit mobile version