Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात ?काय आहे विशेष महत्त्व ?

Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात ?काय आहे विशेष महत्त्व ?

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा करण्याची प्रथा आहे.

अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त कधी: अक्षय्य तृतीया 10 मे रोजी आहे. या दिवशी सोने, चांदी आणि दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. यावेळी अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त  रोजी दिवसभर आहे.  याशिवाय संध्याकाळपासून रात्रीपर्यंत सोने खरेदी करता येते. या दिवशी, तुम्ही गृहप्रक्रिया समारंभ, मुंडन संस्कार, किंवा नवीन काम सुरू करू शकता. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते.

यासोबतच या दिवशी सोने, चांदी इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. पंचांगानुसार या वर्षी अक्षय्य तृतीयेला अतिशय शुभ योग तयार होत आहे. अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात हे आपण जाणून घेऊया….

भारतीय वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या दिवशी अन्न, वस्त्र, सोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच घरात अक्षय्य तृतीयाला सोन्याची वस्तू खरेदी केल्याने घरात सोन्याची कमतरता भासत नाही.

सोने का खरेदी करावे काय फायदे आहेत जाणून घेऊया-


First Published on: May 4, 2024 8:53 AM
Exit mobile version