जुनी Bra अशी करा रियुज

जुनी Bra अशी करा रियुज

मार्केटमध्ये काही प्रकारच्या ब्रा डिझाइन्स येतात. मात्र काही महिलांना डिझाइनर ब्रा घेण्यास काचकूच करतात. कारण काही काळानंतर त्या फेकून द्यायच्या असतात असा विचार करून त्या घेत नाहीत. अशातच त्या डिझाइनर ऐवजी उत्तम क्वालिटीच्या ब्रा खरेदी करतात.ब्रा जुनी झाल्यानंतर बहुतांश महिला त्या फेकून देतात. परंतु तुम्ही त्या रियुज कशा प्रकारे करू शकता हे माहितेय का? आता पुढील काही ट्रिक्स वापरून तुम्ही त्या रिसाइकलिंग करू शकता.

जुन्या ब्रा पासून तयार करा टॉप


जर तुमची ब्रा जुनी झाली असेल तर ती फेकून देण्याऐवजी त्याचा टॉप तयार करू शकता. सध्याच्या काळात फ्रिंज टॉपचा ट्रेंन्ड आहे. त्यामुळे हा टॉप तयार करण्यासाठी तुम्ही जुन्या ब्रा चा वापर करू शकता. फ्रिंज टॉप बनवण्यापूर्वी या गोष्टीची काळजी घ्यावी की, तुम्हाला काही प्रकारचे फ्रिंज डिझाइन्स मिळतील. परंतु तुम्ही तुमच्या ब्रा ला मॅचिंग रंगाच्या फ्रिंजची निवड करावी.

पॅडेड ब्रा रिसाइकलिंग
जर तुमची पॅडेड ब्रा जुनी झाली असेल तर तुम्ही ती फेकण्याऐवजी त्याला छान लूक देऊ शकता. त्यावर तुम्ही रिबन, लेस, आर्टिफिशियल फ्लॉवरचा वापर करू शकता. आजच्या काळात बोल्ड लूकसोबत ब्रालेट टॉप्सचा ट्रेंन्ड खुप वाढला गेला आहे. अशातच तुम्ही ब्रा मस्त डेकोरेट करून डिझाइनर साडीसोबत क्लब करू शकता. या व्यतिरिक्त वेस्टर्न आउटफिट्स सोबत कॅरी करू शकता.

डिझाइनर ब्रा ला तुम्ही अन्य काही लूक्स देऊ शकता. यासाठी ब्रा खरेदी करताना डिझाइनर ब्रा कडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची ब्रा जरुर खरेदी करा.


हेही वाचा- Bra चे हूक एकसारखे का असतात?

First Published on: October 22, 2023 2:39 PM
Exit mobile version