Periods मध्ये पाच दिवसांनंतर ही bleeding होत? मग काळजी घ्या

Periods मध्ये पाच दिवसांनंतर ही bleeding होत? मग काळजी घ्या

मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिलांना प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या प्रक्रियेतून जावे लागते. या दरम्यान तीन ते सात दिवस त्यांच्या शरिरातून ब्लिडिंग होत असते. पण बहुतांश महिलांना मासिक पाळी दरम्यान पोट आणि कंबर फार दुखण्याची समस्या निर्माण होते. मासिक पाळी दरम्यान असे दुखणे सर्वसामान्य आहे. परंतु काही महिलांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागतो.

काही महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान ब्लड फ्लो हा अधिक असतो तर काही जणांमध्ये तो सामान्य असतो. तसेच काही महिलांमध्ये मासिक पाळीत ब्लिडिंग हे सात दिवसांपर्यंत होते. पण त्यापेक्षा ही अधिक दिवस तुमच्या शरिरातून ब्लिडिंग होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

सात दिवसापेक्षा अधिक ब्लिडिंग होण्यामागील कारण
मासिक पाळीबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा त्यामागे काही फॅक्टर्स असतात. काही वेळेस तुमची मासिक पाळी सामान्य ते अधिक वेळेपर्यंत राहू शकते. पण वयानुसार त्याचा कालावधी ही बदलला जातो.

अल्पवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान हार्मोन्समध्ये बदल अथवा ते असंतुलित होतात. काही वेळेस त्यांना मासिक पाळी अधिक दिवस सुद्धा येते. खासकरुन प्युबर्टीच्या सुरुवातीला मासिक पाळी आल्यानंतर ती दीर्घकाळ असते. पण वाढलेल्या वयातील महिलांमध्ये गर्भावस्था संबंधित आजार जसे फाइब्रॉइड्स आणि एडीनोमायोसिस आणि संक्रमणाच्या कारणास्तव समस्या येऊ शकते.

तज्ञांचे असे म्हणणे आहे की, जर महिलांना मासिक पाळी सात दिवसांपेक्षा अधिक दिवस राहिल्यास किंवा अधिक ब्लड क्लॉट्स त्यांना दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. महिलांनी याकडे सुद्धा लक्षात ठेवावे की, त्यांच्या मासिक पाळीचा रंग कसा आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


हेही वाचा- घरच्या घरी असे बनवा Sanitary Pads

 

First Published on: April 26, 2023 4:14 PM
Exit mobile version