केसांसाठी फायदेशीर पेरूची पाने

केसांसाठी फायदेशीर पेरूची पाने

पेरूची पाने

पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत परंतु पेरूची पाने केसांसाठी औषधाचे काम करतात. अलीकडेच एका संशोधनात समोर आले आहे की, पेरूची पाने केस गळतीवर औषधाप्रमाणे वापरले जाऊ शकतात. याने केस दाट होतात आणि कोंड्यापासून मुक्ती मिळते. एवढंच नाही तर हे वापरल्याने केस सॉफ्ट आणि शाईनी सुद्धा दिसतात.

असे तयार करायचे लोशन
१ लीटर पाणी उकळवून त्यात पेरूच्या झाडाची पानं टाकून २० मिनिटांपर्यंत उकळी येऊ द्यावी. गार झाल्यावर गाळून घ्यावे.

असे लावावे केसांना लोशन

*सर्वात आधी शाम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. कंडिशनर लावू नये.

*केस वाळल्यावर ते चार भागांत वाटून त्यावर लोशन लावावे.

*कमीत कमी १० मिनिटे केसांना मसाज करावी.

*मसाजनंतर लोशन दोन तासांसाठी तसेच राहू द्यावे. लोशन रात्री लावल्यास टॉवेलमध्ये केस गुंडाळून रात्रभर असेच झोपू शकता.

*नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करावेत. हे लोशन तुम्ही केसांना आठवड्यातून तीनदा लावू शकता.

ही काळजी घ्या
लोशन नेहमी रूम टेंपरेचरवर गार करावे. केसांना गरम लोशन अजिबात लावू नये.

First Published on: November 13, 2018 5:02 AM
Exit mobile version