Wednesday, May 8, 2024
घरमानिनीBeautyसुरकुत्या, फाइन लाईन कमी करण्यासाठी डाळिंबाची साल उपयुक्त

सुरकुत्या, फाइन लाईन कमी करण्यासाठी डाळिंबाची साल उपयुक्त

Subscribe

वाढत्या वयानुसार चेहऱ्यात अनेक बदल होतात. अशावेळी घरच्या घरी तुम्ही डाळिंबाच्या सालीपासून तयार फेसपॅक वापरू शकता. डाळिंबाच्या सालाचा वापर त्वचेतील कोलेजनला तोडणाऱ्या एंजाइम्सला रोखतात. त्वचेच्या पेशींचा विकास करण्यास देखील मदत करतात. यामुळे वय वाढल्याच्या समस्या, सुरकुत्या, फाइन लाईन, डार्क सर्कल अशा समस्यांपासून बचाव होतो.

चेहऱ्यासाठी डाळिंबाची साल उपयुक्त

9 Science-Backed Benefits of Pomegranate Peels

- Advertisement -
  • डाळिंबाच्या सालीत अॅन्टिऑक्सिडंट असतात. याच्या माध्यमातून चेहऱ्यावरील डाग आणि संक्रमणापासून दूर ठेवण्यास मदत होते. डाळिंबाची साल वाळवून तव्यावर भाजावी. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून ही भुकटी चेहऱ्यावर लावावी.
  • डाळिंबाची साल हलक्या हाताने चेहऱ्यावर घासा. यातून ‘डेड स्किन’ निघून चेहऱ्यावर तजेला येईल. तसेच, डाळिंबाची साल वाळवून त्याचा पावडर बनवावे. त्यात गुलाब पाणी मिसळून फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचेवरील तजेला कायम राहतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळता येतात.
  • डाळिंबाच्या सालीत हिलिंग घटक असल्याने पिंपल्स, पुरळ आणि त्वचेवर आलेले रॅशेस कमी होण्यास मदत मिळते. अँटी ऑक्सिडेंट बॅक्टेरिया तसेच इतर इन्फेक्शनपासून त्वचेची काळजी घेतली जाते.

Health Benefits Of Pomegranate Peel: How To Make Pomegranate Peel Tea  (Recipe Inside) - NDTV Food

  • डाळिंबाचे साल त्वचेसाठी सनस्क्रीम सारखे काम करते. याच्या वापराने सुर्याच्या किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे त्वचेची सुरक्षा होऊन काळे डाग चेहऱ्यावर पडत नाही.
  • केवळ चेहऱ्यासाठीच नव्हे तर डाळिंबाची साल दातांसाठी देखील फायदेशीर आहे. डाळिंबाची साल वाळवून त्याचा पावडर तयार करावी. एक ग्लास पाण्यात मिसळून त्याच्या गुळण्या केल्यास दातासंबंधीच्या समस्या, तोंड येणे, दुर्गंधीपासून मुक्तता मिळविणे शक्य आहे.

हेही वाचा :

Face Scrubbing : स्क्रबिंग करताना टाळाव्यात ‘या’ चुका

- Advertisment -

Manini