‘या’ फूड्समुळे वाढू शकतात Labour Pain

‘या’ फूड्समुळे वाढू शकतात Labour Pain

प्रेग्नेंसी दरम्यान महिलांनी खास काळजी घ्यायची असते. अशावेळी प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक खायची आणि करायीच असते. जेणेकरुन एखाद्या समस्येपासून दूर राहता येईळ. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या खाल्ल्याने तुम्हाला लेबर पेनची समस्या होऊ शकते अथवा ती वाढू सुद्धा शकते.

-जिऱ्याची चहा


प्रेग्नेंसी मध्ये गरम जिऱ्याची चहा प्यायल्याने गर्भाशय आकुंचन पावण्यास उत्तेजित होते. यामुळे खुप दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

-विनेगर


प्रेग्नेंसी दरम्यान बालसेमिक विनेगर लेबर पेन उत्तेजित करण्याचे काम करते. याची चव जरी उत्तम असली तरीही गर्भवती महिलांनी त्याचे सेवन करणे नुकसानकारक ठरु शकते.

-पपई


कच्च्या पपईत पपॅइन नावाचे एक एंजामाइन असते. हे गर्भाशयाच्या आकुंचनाला ट्रिगर करते. त्यामुळेच प्रेग्नेसींदरम्यान पपई खाऊ नये.

-अननस


अननसात ब्रोमलिन असते. यामुळे लेबर पेन सुरु होतात. यामुळेच प्रेग्रेंसी दरम्यान अननस खाऊ नये.

-तिखट खाद्यपदार्थ


प्रेग्नेंसी दरम्यान तिखट खाद्यपदार्थ खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला लेबर पेनच्या समस्येला सामोरे जावे लागेल. यामुळे ते खाणे टाळा.

-स्ट्रॉबेरीची चहा


याची चहा तुमच्या गर्भाशयाचे स्नानू आकुंचित करतात. त्यामुळेच गर्भवती महिलांनी ती पिऊ नये.

-मुलेठी


मुलेठीमध्ये ग्लाइसीर्रिजन असते. ते गर्भाशयाच्या आकुंचनात असलेल्या प्रोस्टाग्लँडिंसला वाढवते. यामुळेच गर्भवती महिलांनी प्रग्रेंसी दरम्यान त्याचे सेवन करु नये.


हेही वाचा- Pregnant Women Tips : गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी अशी घ्या काळजी

First Published on: April 24, 2023 1:39 PM
Exit mobile version