कोरोनाशी लढण्यासाठी ‘हा’ काढा ठरतोय प्रभावी; संस्थेचा दावा

कोरोनाशी लढण्यासाठी ‘हा’ काढा ठरतोय प्रभावी; संस्थेचा दावा

राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील गांधी विद्या मंदिरचे श्री भंवरलाल दुगड विश्वभारती केमिकल लॅबमध्ये बनवलेल्या रोग-प्रतिरोधक काढा कोरोना विषाणूच्या उपचारात खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. राजस्थानसह पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगालसह आतापर्यंत डझनभर राज्यांमधून आयुर्वेदिक औषधाच्या काढ्याची मागणी होत आहे, असं गांधी विद्या मंदिर सरदारशहर संस्थेने म्हटलं आहे. गांधी विद्या मंदिर सरदारशहर संस्थेचा दावा आहे की त्यांचा आयुर्वेदिक काढा कोरोना विषाणूवर प्रभावी सिद्ध होत आहे. ज्यामुळे संस्था प्रतिरोधक प्रतिकारशक्ती लक्षात घेता दररोज एक लाख पॅकेट तयार करीत आहे, परंतु जास्त मागणीमुळे आता पॅकेटचे उत्पादन लवकरच दररोज १ लाखांवरून दररोज तीन लाख केलं जाईल. शिपिंग देशभरात विनामूल्य केले जाईल.

गांधी-विद्या मंदिरात रोगप्रतिरोधक काढा उपकरणे सातत्याने काम करत असतात. संस्थेचे अध्यक्ष हिमांशु दुगड म्हणाले, आयुर्वेदिक काढा कोरोना विषाणूच्या उपचारात प्रभावी सिद्ध होत आहे. हे लक्षात घेता गांधी विद्या मंदिर दररोज १ लाख पॅकेट तयार करेल, ज्यापैकी एक उपकरण दररोज ३० हजार पॅकेट तयार करेल. गांधी विद्या मंदिरात यंत्रे बसविण्यात आली असून, दररोज सुमारे दोन ते तीन लाख पॅकेट तयार होतील. हिमांशु दुगड यांनी सांगितलं की, हा काढा देशातील सर्व राज्य सरकारांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येईल. राजस्थानने या काढ्याला मान्यता दिली आहे. असे अनेक प्रयोग अनेक राज्यात सुरू आहेत, असं आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा – अनेक वर्ग आर्थिक पॅकेजपासून वंचित, सरकारने पुनर्विचार करावा – पी. चिदंबरम


अहमदाबादमध्ये पोलिस प्रशासनाने कोविड-१९ संक्रमणास सामोरे जाण्यासाठी राजस्थानच्या चुरु शहरातून काढा मागितला आहे. दुसरीकडे भिलवाडा जिल्हा दंडाधिकारी आणि राजस्थान सरकारने असाच एक उपक्रम सुरू केला आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातही आयुर्वेदिक काढ्याच्या वापरावर जोर देण्यात येत आहे, असं संस्थेचे अध्यक्ष हिमांशु दुगड म्हणाले.

 

First Published on: May 18, 2020 8:17 PM
Exit mobile version