RakshaBandhan 2020: रक्षाबंधनसाठी पूजेची थाळी अशी तयार करा

RakshaBandhan 2020: रक्षाबंधनसाठी पूजेची थाळी अशी तयार करा

RakshaBandhan 2020: रक्षाबंधनसाठी पूजेची थाळी अशी तयार करा

कुंकू

पूजेच्या ताटात कुंकू ठेवणे आवश्यक आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण कुंकुपासून करतो. रक्षाबंधन दिवशी भावाला ओवाळताना सुरुवातीला कुंकू लावायचे असते. बहीण कुंकूचा तिलक भावाला लावून त्याच्याप्रती आदर दाखवते आणि बहीण त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. त्यामुळे पूजेच्या थाळीत कुंकू ठेवले जाते.

तांदूळ (अक्षता)

कुंकूचा तिलक लावल्यानंतर त्यावर तांदूळ लावले जातात. तांदुळाला अक्षता म्हटले जाते. तांदूळ शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. यामुळे जीवनात भौतिक सुख-सुविधांची प्राप्ती होते. अक्षता लावण्याचा असा अर्थ होतो की, भावाच्या जीवनावर तिलकाचा शुभ प्रभाव बनून राहायला पाहिजे. यामुळे अक्षता लावल्या जातात.

नारळ

 

मग बहीण तिलक आणि अक्षता लावल्यानंतर नारळ देते. नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते. श्रीफळ हे सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. भावाच्या जीवनात सुख-समृद्धी नेहमी टिकून राहावी आणि त्याची प्रगती व्हावी यासाठी बहीण भावाला नारळ देते.

राखी

नारळ दिल्यानंतर बहीण भावाला राखी बांधते. आपल्याला सगळ्यांच माहित आहे की, राखी हे आपल्या भावाचे रक्षण करते. त्याप्रमाणे राखी बांधल्याने त्रिदोष शांत होतात. ते म्हणजे वात, पित्त आणि कफ. राखी मनगटावर बांधल्यामुळे शरीतात या तिघांचे संतुलन बनून राहते. तसेच मनगटावर राखी बांधल्याने नसांवर दाब पडतो आणि हे तिन्ही दोष नियंत्रणात येतात असे म्हटले जाते.

मिठाई

राखी बांधून झाल्यानंतर बहीण आपल्या भावाला मिठाई भरवते आणि त्याचे तोंड गोड करते. मिठाई प्रमाणे भावा-बहीणच्या जीवनात गोडवा राहावा आणि नात्यात कधीही दुरावा निर्माण न व्हावा. यासाठी भावाला मिठाई खाऊ घातली जाते.

दिवा

मिठाई भरवल्यानंतर बहीण भावाची आरती ओवाळते. आरती ओवाळल्यामुळे सर्व प्रकारच्या वाईट दृष्टींपासून भावाची रक्षा होते. आपला भाऊ नेहमी स्वस्थ आणि सुखी राहा, यासाठी आरती ओवाळून बहीण कामना करते.

पाण्याने भरलेला कलश

पूजेच्या थाळीत पाण्याने भरलेला एक कलश देखील ठेवला जातो. या कलशातील पाणी घेऊन कुंकू मिसळून तिलक तयार केला जातो. प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीत पाण्याने भरलेला कलश ठेवला जातो, अशी परंपरा आहे. कलशात सर्व पवित्र तीर्थ आणि देवी देवतांचा वास असतो, असे म्हटले जाते. यामुळे भावा-बहीणीच्या आयुष्यात सुख आणि प्रेम कायम राहते. अशा प्रकारे वरील दिलेल्या सर्व गोष्टी रक्षाबंधनसाठीच्या पूजेच्या थाळीत ठेवा.

First Published on: August 3, 2020 6:00 AM
Exit mobile version