झटपट रव्याचे अनारसे

झटपट रव्याचे अनारसे

रव्याचे अनारसे

दिवाळीच्या फराळामधील अनारसे हा सर्वात आवडणारा गोड पदार्थ असला तरी मात्र, हा पदार्थ करणे फार कठीण आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला एका सोप्या पद्धतीने झटपट रव्याचे अनारसे कसे बनवावे ते सांगणार आहोत. जेणे करुन तुम्ही यंदाच्या दिवाळीत हे घरच्या घरी झटपट अनारसे तयार करु शकता.

साहित्य

कृती

सर्वप्रथम रवा दह्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवावा. नंतर या गोळ्यात जाडसर कुटलेला डिंक घालून सर्व सारण एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर नेहमीच्या अनारशासारखे अनारसे खसखसवर थापून डीप फ्राय करावे. डिंक लावल्यामुळे अनारसे छान फुलण्यास मदत होते. नंतर याला साखरेच्या पाकात घोळवून काढावे किंवा पाक नसेल वापरायचा तर वरून पिठीसाखर घालून खायला द्यावे.

First Published on: October 23, 2019 6:30 AM
Exit mobile version