खमंग मेथी पॅटीस

खमंग मेथी पॅटीस

खमंग मेथी पॅटीस

सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्वच मंडळी घरी आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत काही चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यास एकदा तरी हे खमंग असे मेथी पॅटीस नक्की ट्राय करा.

साहित्य

पॅटिसच्या आवरणासाठी

दोन कप बेसन पीठ, एक कप तांदळाचे पीठ, चवीनुसार तिखट-मीठ
एक कप ओलं खोबरं, २-३ हिरव्या मिरच्या, २-३ पुदिन्याची पानं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एक कप चणाडाळ भिजवलेली.

कृती

प्रथम मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. त्यामध्ये उकडलेला बटाटा, मटार, मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, तिखट-मीठ, मेथी, जिरे, ओवा, मिरची पेस्ट आणि आले-लसूण पेस्ट टाकून, हे सगळे मिश्रण एकजीव करणे. तसेच पनीरचे तुकडे फ्राय करून घेणे.

नंतर ब्रेडच्या दोन स्लाइस घ्या. त्यातील एका ब्रेड स्लाइसवर हिरवी चटणी लावून त्यात वरील सारण भरा. मग त्यावर पनीरचे तुकडे लावा. दुसऱ्या ब्रेड स्लाइसने कव्हर करून ब्रेडला त्रिकोणी कट द्या. दरम्यान बेसन आणि तांदळाचे पीठ हे मिश्रण एकत्र करून, त्या पाणी घालून त्याचे थोडे घट्ट मिश्रण करून घ्या. वर तयार केलेले स्लाइस या पिठाच्या मिश्रणात बुडवून अलगद तेलात सोडा. ब्राऊन रंग येईपर्यंत तेलात फ्राय करा. हे पॅटिस हिरव्या चटणीसोबत खायला द्या.

 

First Published on: April 8, 2020 6:50 AM
Exit mobile version