Recipe: लंचनंतर भूक लागल्यास झटपट असा बनवा टेस्टी बर्गर

Recipe: लंचनंतर भूक लागल्यास झटपट असा बनवा टेस्टी बर्गर

आजकाल फास्टफूड फार आवडीने खाल्ले जाते. प्रत्येक वयातील लोक बर्गर खाणे पसंद करतात. काही लोकांना बर्गर खाणे ऐवढे आवडते की, ते घरी सुद्धा बनवतात. अशातच तुम्हाला जर कधी दुपारच्या लंचनंतर भूक लागल्यास झटपट असा तयार होणारा टेस्टी बर्गर घरीच कसा बनवावा याची रेसिपी आपण पाहणार आहोत.

साहित्य-
1 बारीक चिरलेला कांदा
1 बारीक चिरलेला टोमॅटो
4 स्लाइस पनीर
2 चमचे लाल तिखट
1 लहान चमचा गरम मसाला पाउडर
2 टेबलस्पून मीठ
2 चमचे रिफाइंड तेल
3 मोठे चमचे ब्रेडक्रंब
1/2 ग्राम आल्याची पेस्ट
1 चमचा लिंबूचा रस
4 बर्गर बिन्स
3 मोठे चमचे बटर
2 मोठे चमचे टोमॅटो केचअप
1 कप चिरलेली कोथिंबीर
1/2 चमचा लसूणची पेस्ट
1/2 कापलेली काकडी
2 उकडलेले बटाटे
2 चिरलेले गाजर
1/2 कप मटर
1/2 कप कॉर्न


कृती-
-बर्गर पेटीज बनवण्यासाठी गाजर, मटर आणि स्वीट कॉर्न एक शीटी होईपर्यंत प्रेशर कुक करा
-एका मोठ्या बाउलमध्ये उकळलेल्या भाज्या, चिरलेला कांदा, लाल मिर्ची पावडर, लिंबूचा रस, गरम मसाला पावडर, मीठ आणि आल-लसूणची पेस्ट टाका
-एका बाउलमध्ये लिंबाचा रस आणि मॅश केलेले बटाटे टाकून ते व्यवस्थितीत मिक्स करा. मिश्रणाचे लहान लहान पेटीज तयार करा
-आता एका कढाईत मंद आचेवर तेल गरम करा तयार पेटीज ब्रेडक्रंबमध्ये दोन्ही बाजूने घोळवून घेत ते तळण्यास टाका. सोनेरी होईपर्यंत ते तळा.
-आता बर्गरचा अर्ध बन घ्या, त्यावर बटर लावा. असे केल्यानंतर स्लाइजवर कांदा, काकडी आणि टोमॅटो ठेवा. आता तयार केलेली पेटीज ठेवा
-कांदा, टोमॅटो, पनीरचे स्लाइज अॅड करा. आता हा बर्गर दुसऱ्या बाजूनेही बंद करा.


हेही वाचा- Recipe: रेस्टॉरंट स्टाइल मॅक्रोनी इडली

First Published on: October 26, 2023 4:21 PM
Exit mobile version