पाठदुखीवर करा घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

पाठदुखीवर करा घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

पाठदुखीवर करा घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

सध्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक जण वक्र फ्रॉम होम करत आहेत. यामुळे एकाच ठिकाणी तासन तास बसून, हायब्रीड पदार्थ खाऊन, व्यायामाचा अभाव आणि आहारातील कमी प्रमाणात असलेले कॅल्शियम या सर्व गोष्टींमुळे पाठदुखी सारखी समस्या उद्भवत आहे. अशा वेळी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय रामबाण इलाज ठरतात. त्यामुळे आज आपण पाठदुखीवर घरगुती उपाय काय आहेत ते जाणून घेणार आहोत.

घरात असलेल्या खुर्चीवर कधी कुबज काढून न बसता आरामदायी बसा.

रोजच्या आहारात दुध, तूप, डिंक, उडीद यांचा समावेश करा.

पूर्ण पालथे झोपण्याऐवजी एक कुशीवर झोपा त्यामुळे पाठीला आराम मिळतो.

सकाळी मोहरी किंवा खोबरेल तेलात लसून घालून गरम करा. मग त्याने मालिश करा आणि दुखत असलेल्या जागेवर कापडाने शेक द्या.

तसेच जास्त वेळ एकाच ठिकाणी बसायचे असल्यास किमान १ तासाने थोडे फिरून या.

आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा वापर करा.

पाठीला आराम देण्यासाठी मीठ चार ते पाच मिनिटे गरम करून ते स्वच्छ कापडात गुंडाळून पाठ शेकवा.

पोहणे, सायकल चालवणे, सकाळी फिरणे हे पाठीदुखीवर उत्तम व्यायाम आहेत. 

तसेच नियमित योगासन करावी. यामुळे पाठदुखीचा त्रास जास्त होत नाही.

First Published on: June 28, 2020 6:00 AM
Exit mobile version