तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणं प्रकृतीसाठी अपायकारक

तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणं प्रकृतीसाठी अपायकारक

तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणं प्रकृतीसाठी अपायकारक

स्वंयपाक घरातून येणाऱ्या खमंग अशा भजी,बटाटे वडे, पूरी , पापड यांच्या सुवासानेच तोंडाला पाणी सुटते. तसेच हे पदार्थ खाण्यासाठी देखील तितकेच चविष्ट व रुचकर लागतात. अनेक महिलांना आपल्या कुटुंबाला असे चमचमीत पदार्थ करुन देण्याची भारी हौस असते. पण अनेकदा हे पदार्थ तयार करतांना जास्त प्रमाणात तेलाचा वापर करावा लागतो व पदार्थ तळून झाल्यानंतर तेल कढईमध्ये उरते यावर उपाय म्हणून अनेक महिला हे उरलेलं तेल (reuse oil) इतर भाज्यामध्ये वापरतात. पण असे करणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तेलाचा पुन्हा वापर केल्याने गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. तज्ञानी दिलेल्या माहितीनूसार, एकदा वापरलेलं तेल पुन्हा गरम केल्यास त्यामधून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. आणि या तेलाचे इतर कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये वापर केल्यास शरीरात फ्री रेडिकल्स वाढू लागतात. यामुळे शरिरावर सूजन येणे तसेत अनेक प्रकारच्या आजारांना सामना करावा लागू शकतो. FSSAI (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) यांनी दिलेल्या गाइडलाइलंस नुसार, एकदा वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे अपायकारक ठरु शकते. (reuse of cooked oil can be harmful)


हे हि वाचा-कांदा आणि लसणाच्या सालींचे फायदे जाणून घ्या…

First Published on: August 18, 2021 5:24 PM
Exit mobile version