Rose Day 2023 : ‘रोझ डे’ का साजरा केला जातो? जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी

Rose Day 2023 : ‘रोझ डे’ का साजरा केला जातो? जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी

गुलाबाच्या फुलाला सर्व फुलांमध्ये लोकप्रिय आणि खास फुल मानलं जातं. त्यामुळेच हे कोणत्याही नव्या नात्याची सुरुवात करण्यासाठी गुलाबाचे फुल दिले जाते. गुलाबाचा संबंध सरळ प्रेम आणि नात्याशी जोडले जाते. तुम्ही गुलाबाच्या फुलाबाबत अनेक गोष्टी ऐकल्या असतील परंतु ‘रोझ डे’च्या दिवशी गुलाबाचे फुल का दिले जाते? हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे.

काय आहे ‘रोझ डे’चा इतिहास?

दरवर्षी जगभरातील लोक 7 फेब्रुवारी रोजी आपल्या पार्टनरसोबत ‘रोझ डे’ साजरा करतात. ‘रोझ डे’बाबत तुम्हाला विविध गोष्टी सांगितल्या जातात मात्र, असं म्हटलं जात की, अनेक वर्षांपासून गुलाबाच्या फुलाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. रानी क्लियोपेट्राने आपली खोली सजवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा वापर केला होता त्यामुळे फेब्रुवारीमधील ‘व्हॅलेनटाइन डे’ची सुरुवात ‘रोझ डे’ पासून केली जाते.

 

गुलाब का दिले जाते?

आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना गुलाब दिल्याने आपले प्रेम आणखी वाढते आणि आपले नाते देखील घट्ट होते. गुलाब फक्त आपल्या पार्टनरलाच नव्हे तर आपल्या मित्रांना, आई-बाबा, भाऊ-बहीणाला देखील द्यायला हवे.

रंगावरुन ओळखा गुलाबाचा अर्थ

लाल किंवा गुलाबी रंगाच्या गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते त्याच प्रकारे पिवळ्या रंगाच्या गुलाबाला मैत्रीचे प्रतीक मानले जाते. नारंगी रंगाचे गुलाब आकर्षणाचे प्रतीक मानले जाते. पांढऱ्या रंगाचे गुलाब शांततेचे प्रतीक मानले जाते, तर काळ्या रंगाचे गुलाब शत्रूतेचे प्रतीक मानले जाते.

 


हेही वाचा :

‘व्हॅलेनटाइन डे’च्या निमित्ताने पार्टनरला द्या ‘ही’ भेटवस्तू

First Published on: February 6, 2023 4:47 PM
Exit mobile version