Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeशिल्लक राहिलेल्या पोळ्यांपासून बनवा 'ही' स्वादिष्ट डिश

शिल्लक राहिलेल्या पोळ्यांपासून बनवा ‘ही’ स्वादिष्ट डिश

Subscribe

घरी एक-दोन तरी एक्स्ट्रा पोळ्या राहतात. अशातच त्या कधीकधी त्या कडक झाल्या असतील तर खात नाहीत. पण त्या पुन्हा तुम्ही खाऊ शकता. त्यापासून तुम्ही विविध पदार्थ तयार करु शकता. जसा की, पोळ्यांचा चुरा, उपमा असे काही. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहोत जी तुम्ही नक्की ट्राय करा.

साहित्य-
शिल्लक राहिलेल्या पोळ्या
तूप
टोमॅटो केचअप
अर्धा चिरलेला कांदा
मीठ
चाट मसाला
1 चमचा मेयोनीज

- Advertisement -

कृती-
सर्वात प्रथम एका तव्यावर तूप टाका, आता त्यावर पोळी कडक होईपर्यंत शेकवून घ्या. ती कडक झाल्यानंतर पोळी एका प्लेट मध्ये काढून ध्या आणि त्यावर अर्धा चमचा केचअप लावा, अर्धा चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाका. त्यानंतर हलके मीठ टाकून चाट मसाला आणि 1 चमचा मेयोनीज लावा. आता तुमची पोळी फोल्ड करा. अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या पोळ्यांपासून तयार करा तुमची ही स्वादिष्ट डिश.


हेही वाचा- मऊ लुसलुशीत पोळीसाठी कणिक मळताना वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini