साताऱ्याचे झणझणीत मटण

साताऱ्याचे झणझणीत मटण

साताऱ्याचे झणझणीत मटण

पावसात झणझणीत चिकन किंवा मटण खाण्याची मज्जाच काही और असते. त्यातीलच आज आपण एक मटणाचा प्रकार बघणार आहोत. ते म्हणजे साताऱ्याचे झणझणीत मटण.

साहित्य

कृती

सर्वप्रथम मटणाला हळद-मीठ लावून मसाला होईपर्यंत बाजूला ठेवून देणे.

मसाल्यासाठी कृती

कढईत खोबरं तांबूस भाजून ठेवा. नंतर दोन कांदे कापून भाजून घेणे. ते गार करून त्यात सात-आठ लसणाच्या पाकळ्या, आलं, हळद, मीठ घालून बारीक पेस्ट करणे.

नंतर कुकरमध्ये तेल घालून बारीक चिरलेला कांदा घाला आणि तांबूस होईपर्यंत परतून घ्या. त्यात दीड चमचा घाटी मसाला घालून परतून घ्या. नंतर त्यात कढीपत्ता, चवीनुसार गरम मसाला आणि मसाला पेस्ट घालून परत परतून घ्या. आता त्यात हळद-मीठ लावून ठेवलेले मटण घाला आणि मसाला एकजीव होईपर्यंत परतावा आणि पाणी घालून चार शिट्या काढा.

First Published on: June 27, 2020 6:11 AM
Exit mobile version