Side Effects Of Drinking Raw Milk:कच्चे दूध पिण्याचे दुष्परिणाम

Side Effects Of Drinking Raw Milk:कच्चे दूध पिण्याचे दुष्परिणाम

दूध हे सुपरफूड मानले जाते. दुधात अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे तज्ज्ञ कायमच दूध पिण्याचा सल्ला देतात. अनेक जणांना सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना दूध पिण्याची सवय असते. पण, अनेकजणांना कच्चे दूध पिण्याची सुद्धा सवय असते. मात्र, कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही सुद्धा कच्चे दूध पीत असाल तर आताच सावध व्हा. डॉक्टरांच्या मते, कच्च्या दूध पिण्याने शरीरावर अनेक विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कच्चा दूध पिवू नये.

कच्या दुधाच्या सेवनाने आरोग्यावर होणारे परिणाम –

एका अभ्यासानुसार, कच्चे दूध आणि कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आतडे आणि पोटावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही नियमितपणे कच्चे दूध पीत असाल तर तुम्हाला जुलाब, पोटदुखी, डिहायड्रेशन, मळमळ, उलट्या, ताप, वजन कमी होणे आदी समस्या उदभवू शकतात.

कच्चे दूध प्रेग्नेंट महिला आणि मुलांसाठी हानिकारक असते. कच्च्या दुधात आढळणारे हानिकारक बॅक्टेरिआ प्रेग्नेंट महिलांसाठी अनेक प्रकारे हानीकारक ठरू शकते. कच्च्या दुध पिण्याने मिस कॅरेज, अकाली प्रेगन्सी, नवजात बालकाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

तुम्ही नेहमी पाश्चराइझ दूध प्यावे शिवाय दूध गरमही असावे. पाश्चराइझ अशी प्रक्रिया आहे जी विशिष्ट तापमानाला दूध गरम करून हानिकारक जिवाणू नष्ट करते. तुम्ही जर एक गोष्ट बारकाईने पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, दुधाच्या पिशवीवर पाश्चराइझ असे लिहिलेले असते.

कच्चे दूध पिण्याने रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे तुमची जर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर कच्च दुधाचे पिवू नका.

कच्चे दूध पिणे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. यात कॅन्सर, डायबिटीस, एड्स यासारख्या गंभीर आजारांचा समावेश असतो.

कच्च्या दुधाच्या सेवनाने तुम्ही पोटाच्या टीबीचे शिकार होऊ शकता. खरं तर, तुम्हाला वारंवार अन्नातून विषबाधा आणि अपेंडिक्सचा त्रास होत असेल किंवा उलट्या, जुलाब, अचानक भूक लागत असेल तर ही लक्षणे पोटाच्या टीबीची असू शकतात. बरेच लोक कच्च्या दुधाचे सेवन करतात आणि हे पोटाच्या टीबीचे मुख्य कारण ठरते.

 

 


हेही पहा : Diabetes असताना ही फळे खाताय?

Edited By – Chaitali Shinde

First Published on: April 26, 2024 5:37 PM
Exit mobile version