रेशमी, लांब केसांसाठी

रेशमी, लांब केसांसाठी

Silky Hair

लांबसडक, रेशमी केस स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात. प्रत्येकीलाच काळेभोर, घनदाट केस हवे असतात. त्यासाठी बाजारात उपलब्ध विविध ब्रँड्सचा आपण वापर करतो. अनेकदा अपुर्‍या माहितीमुळे केसांचे सौंदर्य खुलण्यापेक्षा त्याचे विपरीत परिणाम दिसतात. त्यामुळे घरगुती उपाय तसेच मार्केटमधून कोणती ब्रॅण्ड्स खरेदी करावे याविषयी.

डोक्याला तेलाचा मसाज करा – केसांना आठवड्यातून किमान दोनदा तेलाचा मसाज करावा. खोबरेल तेल केव्हाही उत्तम. तेलाचा मसाज करताना हातांच्या बोटांचा उपयोग करावा. हातांच्या तळव्याने मसाज केल्यास केस तुटण्याची शक्यता असते. शक्यतो रात्रीच डोक्याला मसाज करावा. तेलाचा मसाज केल्याने डोक्यावरील त्वचेची रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते.

थंड पाण्याचा वापर करा – केस धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करावा. हिवाळ्यातही थंड पाण्याने केस धुवावे. गरम पाणी वापरल्यास केस रुक्ष, दुबळे, रखरखीत होऊन केस गळण्याची भीती आहे.

केस नियमित कापा – नियमित केस कापणे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे केसांची रुक्ष टोके नष्ट होऊन केसांचे सौंदर्य देखील वाढते.

केस घट्ट, आवळून बांधू नये – केसांचा शक्यतो सैलसर पोनीटेल बांधावा. हेअरबँड्सने केस घट्ट आवळून बांधू नये. असे केल्याने केसांची मुळे दुबळी होऊन केस तुटण्याची, गळण्याची शक्यता आहे.

मेहंदी लावा – ब्रँडेड कंडिशनिंग क्रिम्सचा वापर केल्याने केसांना हानी पोहचू शकते. त्यामुळे केसांना मेहंदी, तेलाचे मिश्रण लावावे. लांब, रेशमी केसांसाठी मेहंदी नैसर्गिक कंडिशनिंगचे काम करते.

केस रंगवताना सावधगिरी बाळगा – केसांना वारंवार रंग लावल्याने केसांचे आरोग्य बिघडू शकते. तसेच कलरिंग करताना डोक्याच्या त्वचेला रंग लागणार नाही याची काळजी घ्यावी.

First Published on: February 16, 2019 4:58 AM
Exit mobile version