तुम्हीही झोपेत घोरता का ? मग करा हे उपाय

आपल्यापैकी अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. विशेष म्हणजे झोपेत आपण घोरतो हेच अनेकांना कळत नाही. पण पार्टनरच्या घोरण्याच्या या सवयीचा समोरच्याला मात्र भलताच त्रास होतो. यामुळे बऱ्याचवेळा ज्यांना घोरण्याची सवय असते अशा व्यक्ती सहसा कुठे नातलग किंवा मित्रमैत्रीणींबरोबर बाहेर जाणेही टाळतात. पण थोडी सावधगिरी बाळगली तर घोरणे कमी होते.

घोरण्याची कारणे
घसा आणि नाक यांच्यातील पोकळीतील टिश्यूचे कंपन होत असल्यास विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. यालाच घोरणे असे म्हणतात. घोरणे ही जरी सामान्य समस्या असली तर त्याची कारणे मात्र बरीच आहेत.

अॅलर्जीचा त्रास, नाकाची विकृती, जीभ जाड असणे, अनुवांशिकता. दारु, सिगारेटचे व्यसन, टॉन्सिल आणि औषधांचे दुष्परिणाम ही देखील घोरण्याची कारणे आहेत.

मद्य सेवन टाळणे

दारु पिल्यानंतर शरीरातील स्नायू अधिकच रिलॅक्स होतात. यामुळे नाकपुडीतून बाहेरील हवा आत जाण्याच्या प्रक्रियेला अडथळा येतो. घोरणे वाढते. यामुळे कुशीवर झोपावे.

नाक स्वच्छ ठेवा
सर्दी झाल्यावर नाक बंद झाल्यास नाकपुडी स्वच्छ कराव्यात. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा येणार नाही. तसेच नाकाच्या आणि घशाच्या स्नायूंवर ताणही येणार नाही यामुळे घोरणे आपोआपच कमी होते.

पाठीवर झोपू नये

पाठीवर झोपल्याने नाकाचे स्नायू आकुंचन पावतात त्यामुळे श्वास घेताना घशातील टिश्यूंवर ताण येतो आणि घोरणे सुरू होते. यामुळे एका कुशीवर झोपावे, डोके उशीवर ठेवून झोपावे.

वजन कमी करावे

वाढलेले वजन हे देखील घोरण्याच्या सवयीच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. वजन वाढले की शरीरात चरबी वाढते. यामुळे गळ्याजवळ फॅटस जमा होतात. झोपल्यावर श्वास घेताना गळ्याजवळील टिश्यू आकुंचन पावतात. यामुळे व्यक्ती घोरायला लागते. हे टाळायचे असल्यास नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवावे

पुदीना तेल
झोपण्यापूर्वी पुदीन्याच्या तेलाचे दोन थेंब पाण्यात घालून त्याच्या गुळण्या कराव्यात. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते.

ऑलिव्ह ऑईल

घोरण्यावर नियंत्रण मिळवण्यात ऑलिव्ह ऑईल फायदेशीर ठरते. श्वास घेताना त्रास होत असल्यास रोज रात्री झोपण्याआधी मध आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र घ्यावे. वजन तर कमी होतेच शिवाय घोरणेही कमी होते.

 

 

 

 

 

First Published on: December 20, 2021 6:22 PM
Exit mobile version