अशी घ्या साड्यांची काळजी

अशी घ्या साड्यांची काळजी

या तुमच्या प्राण प्रिय साड्यांची काळजी कशी घ्यावी याकरिता काही खास टिप्स पुढीलप्रमाणे.

*नक्षीकाम केलेल्या साड्यांना विशेष जपावे लागते. अशा साड्या धुताना जास्त पिळून घेऊ नयेत. अशाने त्यावरील जरीचे काम, मणी टिकल्यांचे कोंदण निघू शकते.

*अशा साड्या वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यास, ब्रशने घासल्यास लवकर खराब होतात. म्हणून, हलक्या हाताने नीट विसळून घ्याव्यात.

*साधारण दोनदा साडी वापरल्यानंतर ड्रायक्लीनला द्यावी.

*साड्या सावलीत सुकवाव्यात, यामुळे साडीची चमक टिकून रहाते.

*बॅगमध्ये साड्या ठेवण्याआधी प्रत्येक साडी तपकिरी रंगाच्या कागदात गुंडाळावी. यामुळे, हवेतील दमटपणा कागद शोशून घेतो व साडी सुरक्षित रहाते.

*जरीच्या साड्या मलमलच्या किंवा कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवल्या तर त्यावरील जरीचे काम छान टिकते.

*सिल्कच्या साडीवर थेट डिओचा वापर करु नये. कारण, साडीवर डिओचे डाग पडण्याची शक्यता असते.

* वरचेवर न वापरल्या जाणार्‍या साड्या, वॉर्डरॉब स्वच्छ करताना किमान त्या कोरड्या हवेत उघडून ठेवाव्यात.

*बरेचदा साडी घडी झालेल्या रेषेवर फाटते, यासाठी काही महिन्यांच्या अंतरांनी साड्यांची घडी बदलावी.

*सिल्कच्या साड्यांची घडी घालताना टिश्यू पेपरचा वापर करायचा. त्यामुळे त्या कपड्यांत ओलसरपणा रहात नाही. टिश्यू पेपरऐवजी बटर पेपरवर साडी रोल करून ठेवली तरी चालेल.

*जरी काळी पडली तर पॉलिश करायची. पण सारखी पॉलिश नाही करायची. या जरीला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची. कारण पाण्यामुळेच सर्वात जास्त जर काळी पडते.

*कपाटात कडुलिंबाची पाने ठेवावीत, ज्यामुळे कपाटातील कुबटपणा दूर होऊन, कपड्याला बुरशी येऊन कपडा खराब होत नाही.

First Published on: October 5, 2018 1:56 AM
Exit mobile version