चेहर्‍यासाठी काही सोपे व्यायाम!

चेहर्‍यासाठी काही सोपे व्यायाम!

चेहर्‍यासाठी काही सोपे व्यायाम

चेहर्‍याच्या त्वचेचे आरोग्य उत्तम रहावे याकरिता, त्वचेला अनेक प्रकारच्या क्रिम लावल्या जातात. सोबतच योग्य आहारही घेतला जातो. तसेच चेहर्‍याच्या त्वचेचे रक्ताभिसरण योग्य व्हावे यासाठी चेहर्‍याचे काही खास व्यायाम प्रकार केले तर तुमची त्वचा आणखीनच सुंदर दिसेल आणि त्वचेवर लवकर सुरकुत्या पण दिसणार नाहीत.

* मान ताठ सरळ ठेवून आयब्रो वर खाली करावी.
* भुवया ताणून, कपाळावर आडव्या आणि उभ्या आठ्या आणाव्या.
* मान सरळ ठेवून वर-खाली बघावे.
* डोळ्यांना दोन्ही दिशांमध्ये गोल फिरवावे.
* तळहात आपसात रगडून काही वेळासाठी डोळ्यांवर ठेवावे.
* सकाळी आणि रात्री डोळ्यांना थंड पाण्याने धुवावे.
* नाकपुडी फुलवून ढिले सोडावे.
* संपूर्ण तोंड उघडावे आणि बंद करावे.
* ओठांना बंद करून परत उघडावे.
* तोंडाने फुगा फुलवावा.
* मानेची कातडी ओढावी, जबडा टाइट करावा.
* दहापर्यंत मोजताना मानेला पाठीमागे आणावे.
* तोंडात पाणी भरून हालवावे.
* झोपण्याअगोदर रोज चेहरा स्वच्छ करून झोपावे. जर तुम्ही वर्किंग वूमन असाल तर डीप क्लिंजिंग मिल्कने स्वच्छ करावा.

व्यायामाच्या व्यतिरिक्त संतुलित खान-पान तुमच्या त्वचेत चमक आणतो. म्हणून जेवणात दूध, दही, सलाड, फळं, हिरव्या भाज्यांचा समावेश अवश्य करावा.सोबतच भरपूर पाणी प्यायला पाहिजे, सूर्याच्या तेज किरणांपासून आपला बचाव केला पाहिजे आणि उन्हाचा चष्मासुद्धा लावायला पाहिजे.

First Published on: December 13, 2018 4:01 AM
Exit mobile version