हिरड्यांमधून रक्त येत असल्यास करा घरगुती उपाय

हिरड्यांमधून रक्त येत असल्यास करा घरगुती उपाय

हिरड्यांमधून रक्त येत असल्यास करा घरगुती उपाय

बऱ्याचदा कडक ब्रश वापरल्याने किंवा योग्य प्रकारे कृत्रिम दात न बसल्याने दातांच्या हिरड्या दुखण्यास सुरुवात होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करु नका. कारण यामुळे पेरीओडोंटायटिस, व्हिटॅमिनची कमतरता, मुखदुर्गंधी यासारखे आजार पुढे होऊ शकतात.

मिठाच्या पाण्यांनी गुळण्या करा

मीठ एक Antiसेप्टिक आहे. त्यामुळे घशाचे इन्फेक्शन तसेच दातांच्या आजारात मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर आराम पडतो.

मध

हिरड्यांमधून रक्त येत असल्यास मध अत्यंत गुणकारी ठरते. मधामध्ये असलेल्या Antiyबॅक्टेरियल, Antiyइंफ्लेमेट्री गुण असतात यामुळे हिरड्या आणि दातामधील सूक्ष्म किटाणू मारले जातात.

हळद

हळदीमध्ये उत्तम नैसर्गिक Antiyमायक्रोबियल आणि Antiyइंफ्लेमेट्री गुण असतात. हळदीच्या वापरानेही हिरड्यांमधून येणारे रक्त कमी होऊ शकते. हळदीमध्ये असणारे करक्युमिन कुठल्याही प्रकारची सूज आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी गुणकारी आहेत.

खोबरेल तेल

हिरड्यांमधून येणारे रक्त, दात दुखी, हिरड्या सुजणे आणि दुखणे यावर ‘खोबरेल तेल’ गुणकारी आहे. खोबरेल तेलात Antiyइन्फ्लेटरी आणि Antiyमायक्रोबियल गुण असल्याने आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकेल, असा एक चांगला उपाय आहे.

लवंग

हिरड्यांमधुन रक्त येत असेल तर थोडावेळ एक ‘लवंग’ दातावर धरून ठेवा.

First Published on: November 3, 2020 6:43 AM
Exit mobile version