करियरमध्ये यश मिळवण्यासाठी असा ठेवा तुमचा Attitude

करियरमध्ये यश मिळवण्यासाठी असा ठेवा तुमचा Attitude

सध्याच्या स्पर्धात्मक जगात पुढे जाण्यासाठी बदलत्या काळासोबत तुम्हाला स्वत:ला ही तुमच्यात बदल करावा लागेल. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. अशातच करियरमध्ये तुम्हला यश मिळवायचे आहे तर तुमचा अॅटिट्युड कसा आणि त्यासाठी काय करावे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे योग्य अॅटिट्युडसह तुम्ही करियरच्या मार्गावर चालायला लागलात तर यश नक्कीच मिळेल.

योग्य अॅटिड्युड म्हणजे नक्की काय?
द अॅडवान्स लर्नर्स डिक्शनरी ऑफ करंट इंग्लिंशनुसार, अॅटिड्युट म्हणजे प्रत्येकाचा आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन. तुम्ही कसा विचार करता, कसे राहता आणि तुम्ही दुसऱ्याशी कसे वागता हे सुद्धा फार महत्वाचे आहे. दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाल्यास अॅटिट्युडचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही कसे बोलता-वागता तर आपण कसे समजून घेऊ शकतो, आपली काम करण्याची पद्धत, आयुष्य जगण्यासंदर्भातील तुमचा विचार हे सुद्धा फार महत्वाचे असते.

-आपल्या अॅटिट्युडला बदलण्यासाठई सर्वात प्रथम इमानदारीने आपले स्वत:चे आत्मपरिक्षण करा, जसे तुम्हाला बनायचे आहे. यामुळे तुम्ही तुमच्यातील उणीवा दूर करु शकता.
-तुम्ही तुमच्यासाठी असा एक रोलमॉडेल निवडा ज्याप्रमाणे तुम्हाला बनायचे आहे. त्याच्यासारखा अॅटिट्युड ठेवा आणि आपल्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा
-या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या की, तुमचा बदललेला अॅटिट्युड हा तुमच्या करियरला कशाप्रकारे प्रभावित करेल. त्यामुळे तुमची ऑफिसमध्ये प्रतिष्ठा वाढेल आणि बॉसच्या नजरेत तुमची उत्तम इमेज तयार होईल.
-काहीवेळेस असे होते की, आपण आपले लक्ष्य सेट करतो पण कधीकधी नकारात्मक विचार मनात येतात. अशातच वाटते की, हे आपल्याकडून होणार नाही. यामुळे निगेटिव्ह अॅटिट्युड तुमच्यात निर्माण होतो. तो दूर करत सकारात्मक विचार करा आणि बदल पहा.

 


हेही वाचा: ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहण्यासाठीच्या ‘या’ स्मार्ट टीप्स

First Published on: April 13, 2023 5:39 PM
Exit mobile version