Summer Eye Irritation – उष्णतेमुळे डोळ्यात जळजळतंय, करा हे उपाय

Summer Eye Irritation – उष्णतेमुळे डोळ्यात जळजळतंय, करा हे उपाय

उन्हाळ्यात आरोग्याशी संबंधित विविध समस्या उद्भवतात. पण यात डोळ्यांशी संबंधित समस्या अधिक त्रासदायक असतात. विशेषत: या ऋतूत डोळे लाल होतात आणि सूज येण्याबरोबरच जळजळही होते. यावेळी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर काही घरगुती उपायांनीही हा त्रास दूर करता येतो.

उन्हाळ्याच्या हंगामात, तीव्र सूर्यप्रकाशामुळे बहुतेक जणांना डोळ्यांच्या समस्यांचा त्रास होतो. डोळ्यात जळजळ, खाज आणि लालसरपणा येतो. तर डोळ्यांच्या थकव्यामुळे काहींना डोळा दुखण्याचाही त्रास होतो.

बर्फ
डोळ्यांची जळजळ किंवा ऍलर्जीशी संबंधित खाज सुटण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी तुम्ही डोळ्यांवर थंड कापड किंवा बर्फाचा पॅक वापरू शकता. याशिवाय डोळ्यांवर थंड पाणी शिंपडू शकता.

डोळे धुवावे
जर तुमच्या डोळ्यांना खाज सुटत असेल तर डोळे स्वच्छ धुवावे. सूक्ष्म कणामुळे किंवा धुळीमुळेही डोळे जळतात. यामुळे पाण्याने डोळे स्वच्छ करावे. यामुळे तात्काळ आराम मिळतो.

गुलाब पाणी
डोळ्यांमध्ये जळजळ आणि खाज येत असेल किंवा डोळे थकले असतील तर गुलाबपाणी वापरावे. यासाठी गुलाब पाण्यात कापूस बुडवून डोळ्याभोवती लावा. त्याचे काही थेंबही डोळ्यात टाकू शकता.

 थंड काकडी
उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी काकडीचा वापर करा. यासाठी थंड काकडी घ्या, तिचे काप करा. आता हे काप दोन्ही डोळ्यांवर 15-20 मिनिटे ठेवा . डोळ्यांचे दुखणे थांबेल.


 

First Published on: April 27, 2024 4:20 PM
Exit mobile version