उन्हाळ्यात जपा केसांचे आरोग्य

उन्हाळ्यात जपा केसांचे आरोग्य

Hair Care

कडक उन्हामुळे केसांचं नुकसान होतं. म्हणूनच उन्हाळ्यात त्वचेइतकीच केसांचीही काळजी घ्यावी लागते. उन्हाचा थेट संपर्क केसांशी झाल्याने केस निस्तेज होणं, कोरडे होणं किंवा फाटे फुटणं अशा अनेक समस्या उद्भवतात. यासाठी या काळात केसांकडे जरा अधिक लक्ष द्यावं लागतं. केसांचा थेट संपर्क उन्हाशी येऊ नये, म्हणून बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ गुंडाळायला हवा.

*उन्हाळ्याच्या दिवसांत केसांना ब्लो ड्राय पासून जरा लांबच ठेवायला हवं.

*केस धुण्यासाठी थंड किंवा कोमट पाणी वापरा. गरम पाण्याने केस धुतल्यास केसांचं नुकसान होतं.

*भरपूर पाणी प्या. केसांचं तसंच एकंदर आरोग्य जपण्यासाठी ते आवश्यक आहे.

*केसांवर केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा वापर कमीतकमी करा. त्याऐवजी नैसर्गिक उत्पादनं वापरा.

*वारंवार केस धुऊ नका. यामुळे केसांमधील नैसर्गिक मॉयश्चर कमी होईल.

*केसांना शाम्पू केल्यावर कंडिशनर लावा.

*साधारण महिनाभराने केस ट्रिम करा. यामुळे केसांना फाटे फुटण्यापासून बचाव होईल.

*उन्हात केस मोकळे सोडून फिरू नका. त्याऐवजी वर बांधा.

First Published on: March 27, 2019 4:46 AM
Exit mobile version