आला उन्हाळा आता डोळे सांभाळा

आला उन्हाळा आता डोळे सांभाळा

आला उन्हाळा आता डोळे सांभाळा

उन्हाळा आता येऊन ठेपला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराप्रमाणे डोळ्यांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. उन्हाळ्यात डोळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणार आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या अश्रूंच बाष्पीभवन होत असतं. त्यामुळे डोळे कोरडे पडतात. शरीराला जसं भरपूर पाण्याची आवश्यकता असते त्याप्रमाणे डोळ्यांना देखील गरज असते. म्हणून उन्हाळ्यात दिवसभरातून तीन ते चार वेळा डोळे स्वच्छ आणि गार पाण्यानं धुवा. मात्र धुताना डोळे उघडे ठेवू नका. कारण डोळ्यातील नैसर्गिक अश्रू धुतले जातात. तसंच डोळ्यातील अश्रू आणि पाण्याचा पीएच वेगळा असल्यामुळे डोळे चुरचुरु लागतात.

काहीवेळा डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ‘स्टिरॉइड आय ड्रॉप’चा वापर करत असतात. मात्र यामुळे डोळ्यांना काहीवेळा त्रास होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या आय ड्रॉप वापर करू नका. उन्हाळ्यात डोळ्यांना जंतुसंसर्गदेखील होऊ शकतो. अशा वेळेस देखील डॉक्टरांचा सल्ला घेऊन अॅण्टिबायोटिक औषध घ्या. तसंच उन्हाळ्यात कुठेही बाहेर जाताना चांगल्या प्रतीच्या गॉगलचा वापर करा. यामुळे डोळ्यांच संरक्षण होत.

उन्हाळ्यामध्ये डोळ्याचे त्रास हे मोठ्या प्रमाणात उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात कुठेही बाहेर जाताना गॉगल प्रमाणे डोक्यावर टोपी, स्कार्प किंवा रुमाल वापरणे देखील गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात सतत डोळे चोळू नयेत. तसंच महिलांनी चेहऱ्यावर कॉस्मेटिक वापरताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.


हेही वाचा – स्टॅमिना कसा वाढवाल?


 

First Published on: March 2, 2020 6:15 AM
Exit mobile version