पावसात भिजा; पण त्वचा सांभाळा!

पावसात भिजा; पण त्वचा सांभाळा!

पावसाळ्यात घ्या त्वचेची काळजी

पावसात भिजण्याचा मोह आवरत नाही. मात्र, पावसात भिजल्यामुळे अनेकदा त्वचेचे विकार होतात. त्यामुळे पावसात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी काही खास टीप्स लक्षात ठेवून त्याचा वापर केल्यास पावसात होणाऱ्या त्वेचेच्या विकारापासून दूर राहण्यास मदत होते.

योग्य SPF निवडा

ढगांमुळे उष्णता निर्माण करणारी अतिनील किरणे निश्चितच अडवली जातात, पण त्वचेसाठी हानीकारक UV-A आणि UV-B  किरणे मात्र ढगांमुळे अडत नाहीत. त्यामुळे बाहेर पडताना किमान SPF 15 आणि UV-A (Boots star rating-3) असलेले मेडिकेटेड सनस्क्रीन लावावे. तुमच्या त्वचेला आणि हवामानाला साजेसे सर्वोत्तम सनस्क्रीन निवडण्याविषयी डर्मिटोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा.

शरीराची देखभाल : पावसाळ्यात बुरशीजन्य (सर्वाधिक आढळणारे), विषाणू आणि बॅक्टेरियाजन्य संसर्ग मोठ्या प्रमाणात होतात. नायटा (Tinea ) किंवा गजकर्णासारखे (ringworm) बुरशीजन्य किंवा फंगल जंतूसंसर्ग वरचेवर होताना दिसतात. दमटपणा आणि ओलसरपणा असला की बुरशीचा फैलाव अधिक होतो. त्यामुळे शरीराला जिथे जिथे घड्या पडतात तिथे हा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

First Published on: July 30, 2019 4:00 AM
Exit mobile version