Parenting Tips : मुलांसाठी पाळणाघर निवडताना घ्या ही काळजी

Parenting Tips : मुलांसाठी पाळणाघर निवडताना घ्या ही काळजी

बदलत्या काळानुसार लोकांची आयुष्य जगण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे. काही वर्षाआधी लोक एकत्र कुटूंबात राहत होते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे संगोपन चांगल्या रीतीने होत असे. मात्र, आजची स्थिती वेगळी आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांचे संगोपन, पालन-पोषण यासर्वांवर परिणाम होत आहे. पालक जर नोकरी करणारे असतील तर मुलांचा योग्य आणि सुरक्षेतीपणे सांभाळ केला जाणे ही मोठी समस्या बनली आहे.

आज बहुतांश पालक कामाला जात असल्याने मुलांना पाळणाघरात ठेवलं जात आहे. सकाळी कामाला जाताना मुलांना पाळणाघरात सोडलं जाते आणि कामावरून येताना घरी आणण्यात येते. कितीतरी मुलांचा पाळणाघरात विकास उत्तमरीत्या होतो तर काही मुलांवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो. आजकाल आपण अशा अनेक घटना पाहतो जिथे पाळणाघरात मुलांबाबत अनुचित घडत आहे. त्यामुळे मुलांसाठी पाळणाघराची निवड करताना पालकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरजेचे आहे.

लक्षात घ्या या गोष्टी – 

पालकांनी या गोष्टी अवश्य कराव्यात –

कामावरून आल्यावरून कितीही कंटाळा आला, तुम्ही कितीही थकले असाल तरी मुलांसोबत वेळ घालवा. मूल पाळणाघरात काय शिकले ? तेथे त्याला आवडते का नाही? हे जाणून घेण्याचा प्रयन्त करा. मुलाचे उत्तर समाधानी नसेल तर पाळणाघरी जाऊन तुम्ही क्रोस चेक करायला हवे.

जेव्हा मूल पाळणाघरातून घरी येईल तेव्हा त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नाही ना याची खात्री करा. हल्ली बऱ्याच पाळणाघरात मूल ऐकत नसेल तर अनुचित घटना घडत आहे. त्यामुळे पालकांनी मुलाकडे यासंदर्भात चौकशी करणे ही पालकांची जबाबदारी आहे.

 

 

Edited By – Chaitali Shinde


हेही पहा : मुलं वाढवताना पालकांनी काय करावं ?

 

First Published on: April 14, 2024 1:25 PM
Exit mobile version