जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बदाम हा शरीरासाठी उर्जावर्धक आहार आहे. भिजवलेले बदाम पौष्टिक असून त्याचे शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. यामुळे बदामामधून विटामिन ई, झिंक, कॅल्शियम अशी अनेक पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळत असतात. तसेच भिजवलेले फायदे खाल्ल्याने त्याचा अधिक फायदा होतो. चला तर जाणून घेऊया भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे.

न्यूरोलॉजिकल सिस्टमला फायदा

भिजलेल्या बदामाचे सेवन केल्याने गर्भातील शिशूच्या मस्तिष्क आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमला फायदा होतो. कारण यात फॉलिक ऍसिडची भरपूर मात्रा असते.

सर्दी कमी होते

रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.

कोलेस्ट्रेरॉल

बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात.

ताण कमी होतो

हृद्यावरील ताण कमी होण्यास बदाम फायदेशीर ठरतात. तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

वजन घटते

वजन कमी करायचे असल्यास नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. बदामामुळे पचन सुधारते. तसेच वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते.

मधुमेहावर नियंत्रण

मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर नियंत्रणात राहते.

रक्त शुध्दीकरण

बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त आहे.

First Published on: September 12, 2019 6:30 AM
Exit mobile version