Onions Benefits : कांदा खाण्याचे आहेत अनेक फायदे; चला तर जाणून घेऊ या

Onions Benefits : कांदा खाण्याचे आहेत अनेक फायदे; चला तर जाणून घेऊ या

उन्हाळ्यात कांदा खाणे खूप फायदेशीर आहे. कांद्यामध्ये कमी कॅलरी (Calories) आणि जास्त पोषकतत्त्वे असतात. त्याचप्रमाणे कांद्यात व्हिटॅमिन बी (Vitamin B) , पायरिडोसिन (pyridosine) हे पुरेशा प्रमाणात असल्याने ते शरीरातील मज्जातंतूचे कार्य आणि लाल रक्तपेशी वाढण्याचे काम करत असतात. तसेच पोटॅशियम (Potassium) , मॅग्नेशियम (Magnesium), कार्बोहायड्रेट (Carbohydrates), प्रथिने यांचाही चांगला स्रोत आहे.

कांद्याचे फायदे

कांदा खाल्लाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. लाल कांदा खल्ल्याने रक्तामधील ग्लुकोज (Glucose) पातळी कमी होत असल्याचे एका संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे.

कांद्याच्या कूलिंग इफेक्टमुळे उन्हाळ्यात कांदा खल्लाने शरीराला थंडावा मिळतो, यामुळे शरीराचे तापमान सामान्य राहण्यासाठी मदत होते.

उन्हाळ्यात उष्मा येण्याची शक्यता जास्त असल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. यामुळे कांदा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. कांद्यामध्ये द्रवपदार्थ ठरावीक प्रमाणात असतात. ज्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेट (Hydrate) राहू शकता.

लसूण आणि कांदा यांसारखे एलिअम असलेल्या भाज्या खल्लाने कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते.
जी माणस एलिअम असलेल्या भाजा खातात ते कॅन्सरपासून बरे होण्यासाठी मदत होते. PubMed च्या संशोधनात असे आढळून आले असल्याचे म्हणाले.

कांद्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंटस हे तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि कोलेस्टॅाल कमी करण्यासाठी मदत होते. त्यामुळे हृदयविकार कमी होण्याची शक्यता असते. रक्तदाब नियंत्रणात राहते.

 

First Published on: March 31, 2022 5:04 PM
Exit mobile version