या सवयी आरोग्यदायी

या सवयी आरोग्यदायी

व्यायाम

आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त आरोग्यदायी सवयी.

नियमित व्यायाम महत्वाचा
स्वतःला व्यायाम करायची सवय लावून घ्या. दररोज ४० मिनीटे तरी आर्वजून व्यायाम करा. व्यायामाला तुमच्या दिनचर्येत प्राधान्य द्या. योगसाधना, जीम, इतर व्यायाम प्रकार काहीही तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता. नृत्याची आवड असल्यास त्याद्वारेही तुम्ही तुमचा फीटनेस राखू शकता.

पुरेशी झोप घ्या
झोपेमुळे शरीर-मनाला आराम मिळून त्यांना नवी ऊर्जा मिळते. हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. या उलट सातत्याने अपुरी झोप मिळत असल्यास आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. त्याचबरोबर अपूर्‍या झोपेमुळे रक्तदाब, मधूमेह आणि स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका वाढतो.

भरपूर पाणी प्या
आजारांपासून आणि डॉक्टरांपासून दूर राहायचे असल्यास दररोज ८ ग्लास पाणी प्या. त्यामुळे तुमची शारीरिक कार्य सुरळीत चालतील. त्याचबरोबर वजन कमी करण्यास, पचन चांगले होण्यास आणि त्वचा व केस सुंदर होण्यास मदत होते.

जेवणानंतर दात घासा – जेवल्यानंतर दात स्वच्छ घासले पाहिजेत असं आपल्याला लहानपणापासूनच शिकवलेलं असतं. मात्र दंत तज्ज्ञांच्या मते, अन्नातल्या विविध घटकांमुळे एनॅमल नावाचा दातांवरचा संरक्षक थर जेवणानंतर काही प्रमाणात नाजूक झालेलं असतो. अशावेळेस दात घासण्यामुळे एनॅमल खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे खाल्ल्यानंतर खळखळून चुळा भरा आणि तासाभरानंतर दात घासायला हरकत नाही.

First Published on: April 7, 2019 4:23 AM
Exit mobile version