चांगला नवरा होण्याचे या शाळेत मिळते ट्रेनिंग

चांगला नवरा होण्याचे या शाळेत मिळते ट्रेनिंग

नात्यात आपल्या पार्टनरचा चांगला मित्र बनणे हे देखील एक कला आहे जी प्रत्येकालाच जमते असे नाही. प्रत्येक नात्यातील स्त्री पुरुषांचे भावनांचे बंध हे वेगेवेगळे असू शकतात. त्यामुळे अनेकदा नात्यात अडचणी सुद्धा येतात. कित्येक पत्नींची तर एकच तक्रार असते की, पतीला तिला काय म्हणायचे आहे ते कधीच कळत नाही. यावरून पतिपत्नींमध्ये वादविवाद सुरु होतात आणि अनेक वेळा तर हे वाद घरगुती हिंसाचारापर्यंत पोहोचतात. यावर सोल्युशन म्हणून चक्क अमेरिकेने चांगल्या नवरा बनण्यासाठी एक शाळा सुरु केली आहे.

अमेरिकन देश कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तेथील स्थानिक सरकार या समस्येचे निराकारण करण्यात अक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. परिणामी, कोलंबियाची राजधानी बोगोटा येथील सरकारने पुरुषांना प्रशिक्षण देण्यासाठी शाळा उघडल्या, जिथे त्यांना कुटुंबासह कसे राहायचे हे शिकविले जात आहे. या शाळेत पुरुषांना पत्नीशी कसे बोलायचे, कसे वागायचे याबद्दल शिकविले जाते. २०२१ मध्ये सुरु झालेल्या या उपक्रमाचे अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत.

एका सर्वेनुसार, पुरुष घराची काळजी घेण्यासाठी केवळ 2 तास 19 मिनिटे देतात, जे महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. या सर्वेक्षणानुसार, नोकरदार महिला सरासरी 5 तास 32 मिनिटे घराची काळजी घेतात आणि गृहिणी सरासरी 10 तास घराकडे लक्ष देता. हे सर्व पाहता, या शाळांमध्ये पुरुषांनाही घरातील कामात भाग घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. या शाळांमध्ये पुरुषांना मुलांचे डायपर बदलण्यापासून घरातील सर्व काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे पुरुषांना चांगले पिता, पती आणि पुत्र बनण्यास मदत मिळते.

इतकंच नाही तर घरातील कामात मदत होण्यासाठी बोगोटाच्या स्थानिक सरकारने अशी केंद्रेही उघडली आहेत. जिथे घरातील कामासाठी मोफत मदत मिळू शकते. या केंद्रामध्ये लाँड्रीसारख्या सुविधा देखील आहेत. याशिवाय मानसिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कायदेशीर सल्ला आणि समुपदेशनही घेता येते. तसेच येथे डान्स आणि योगचे वर्गही घेतले जातात.

 

 

 


हेही वाचा : हे आहे अनोखं प्राणीसंग्रहालय, येथे प्राण्यांच्या जागी पर्यटक पिंजऱ्यात

 

First Published on: March 24, 2024 12:11 PM
Exit mobile version