Monsoon Storage Tips : पावसाळ्यात टोमॅटो खराब होतात, मग वापरा ‘या’ टीप्स

Monsoon Storage Tips : पावसाळ्यात टोमॅटो खराब होतात, मग वापरा ‘या’ टीप्स

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीबद्दल तुम्हाला ठाऊकच आहे.अशातच आता पावसामुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत टोमॅटोची योग्य प्रकारे साठवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पावसाळ्यात भाजीपाला हा लवकर खराब होतो. अशा परिस्थितीत त्यांची कमी खरेदी करण्याबरोबरच त्यांची योग्य साठवणूक करणेही तितकेच आवश्यक आहे. पावसाळ्यात भाजीपाला आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे साठवून ठेवल्यास या महागाईत मौल्यवान भाज्या वाया जाणार नाहीत. यासोबतच आता महागाईच्या काळात आज आम्ही तुम्हाला तुमचे महागडे टोमॅटो साठवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यात टोमॅटो व्यवस्थित साठवू शकता.

1. टोमॅटो थंड ठिकाणी ठेवा

पावसाळ्याच्या दिवसात टोमॅटो ओलाव्यामुळे लवकर कुजतात. त्यामुळे ते कुजण्यापासून रोखण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. बाजारातून टोमॅटो आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून ट्रेमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये नीट ठेवा. तसेच टोमॅटो वापरण्याआधी एक तास आधी बाहेर काढा आणि पाण्यात बुडवून ठेवा. त्यांना पाण्यात बुडवून ठेवल्याने ते सामान्य तापमानावर येतील आणि फ्रीझरमध्ये बर्फ तयार झाल्यामुळे ते लवकर खराब होणार नाहीत.

2. ऑलिव्ह तेल लावा

जर टोमॅटो लगेच वापरायचा नसेल तर तो धुवा, पुसून घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईल टाकून चांगले साठवा. अशातच ऑलिव्ह ऑइलमधील गुणधर्म टोमॅटो सडण्यापासून किंवा खराब होण्यापासून रोखतील.

3. प्युरी करा स्टोअर

जर तुम्ही टोमॅटोची प्युरी करून ठेवली तर ती कुजणार नाही. टोमॅटोची पेस्ट बनवण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा. तुम्ही ते बारीक करून साठवू शकता किंवा फक्त तेलात शिजवून ते साठवू शकता.

4. टोमॅटोची पावडर करा स्टोअर

बाजारातून टोमॅटो आणल्यानंतर, बारीक कापून घ्या. आता कापलेले टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर टोमॉटोची हि पेस्ट सुकवून घ्या. सुकल्या नंतर एअर टाईट डब्यात साठवा.


हेही वाचा :

फ्रिजमध्ये ठेवलेली भेंडी लगेच सुकते, मग या टीप्स येतील कामी

First Published on: July 14, 2023 3:15 PM
Exit mobile version