घरच्या घरी तयार करा ‘रंगीबेरंगी टुटीफ्रुटी’

घरच्या घरी तयार करा ‘रंगीबेरंगी टुटीफ्रुटी’

'रंगीबेरंगी टुटीफ्रुटी'

सध्या उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक गृहिणी वाळवणाचे पदार्थ करण्यात मग्न झाल्या आहेत. त्यामुळे तरुण पिढीला काहीतरी करण्याचा उत्साह आहे. मात्र, त्यांना काय करावे असा प्रश्न देखील पडला आहे. पण, तुम्ही तुमच्या आवडीची टुटीफ्रुटी नक्की करु शकता. करायला ही अगदी सोपी आहे. चला तर पाहुया कशी करावी. टुटीफ्रुटी

साहित्य

सर्वप्रथम टुटीफ्रुटी बनविण्यासाठी कच्च्या पपईच्या गराचे चौकोनी तुकडे करुन घ्यावे. त्यानंतर हे तुकडे १ लिटर पाण्यात चांगले शिजवून घ्यावे. त्यानंतर ते गाळून साखरेच्या पाकात घालून घ्यावे. ते चांगले एक दिवस पाकात मुरु द्यावे. नंतर दुसऱ्या दिवशी चार वाट्या घेऊन त्याच्यात थोडे थोडे काढून नंतर आपल्या आवडीनुसार रंग घालवून ठेवावे. नंतर ते गाळणीने गाळून सुती कापडावर सुकत घालावे. अशाप्रकारे मस्त झटपट घरच्या घरी तयार झालेली टुटीफ्रुटी एका बरणीत भरून ठेवावी.

First Published on: May 4, 2020 6:55 AM
Exit mobile version