कॉफी आणि त्याबाबत बरचं काही…

कॉफी आणि त्याबाबत बरचं काही…

कॉफी

स्ट्राँग, हॉट, ब्लॅक, मिल्की, विदाउट शुगर किंवा विथ शुगर कॉफी पिणाऱ्यांची तऱ्हाच वेगळी. तरुणांमध्ये तर चहापेक्षाही कॉफी पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता जागोजागी कॉफीसाठीचे आऊटलेट सर्रास उपलब्ध असतात. या कॉफी शॉप्समध्ये जो प्रकार आपण मागवतो त्यांची नावही वेगवेगळी असतात. आपण नेहमी विविध प्रकारच्या कॉफीचा आस्वाद घेतो. मात्र या नावांप्रमाणे कॉफीची चवही वेगळी असते हे आपल्याला ठाऊक आहे का. जाणून घेऊया कॉफी आणि त्याच्या प्रकाराबाबत बरचं काही…

 

१. एस्प्रेसो

एस्प्रेसो कॉफी

याला ब्लॅक कॉफीही म्हटलं जातं. हा कॉफीचा महत्त्वाचा घटक आहे. देशभरात जितके कॉफी प्रकार आहेत ते या मिश्रणात बनवूनच तयार होतात. ही स्ट्राँग कॉफी जगभरात प्रसिद्ध आहे. पाणी उकळून त्यात एस्प्रेसो पाउडर मिसळून आवडीनुसार साखर टाकून ही कॉफी बनवली जाते.

२. एस्प्रेसो मॅक्कीआटो

एस्प्रेसो मॅक्कीआटो

एस्प्रेसो कॉफीच्या या प्रकारात उकळलेलं दुध टाकलं जातं. हा एस्प्रेसोचाच एक प्रकार आहे. फक्त दुध मिसळ्यामुळे त्याच्या चवीत बदल होतो. डार्क कॉफी पिणारे एस्प्रेसो मॅक्कीआटोची निवड करतात.

३. कॅपोचीनो

कॅपोचीनो

जगभरात कोणत्याही कॉफी शॉपमध्ये कॅपेचीनो हा प्रकार हमखास मिळतो. या कॉफी प्रकारात एस्प्रेसोमध्ये दुध मिसळल जातं. सोबतच चॉकलेट सीरप किंवा चॉकलेट पाउडरने वरून सजावट केली जाते.

४. कॅफे लॅते

कॅफे लॅते

या कॉफी प्रकारात एस्पेसो कॉफीमध्ये तिप्पट दुध मिसळलं जातं. दुधाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही कॉफी सफेद दिसू लागते. आवडीनुसार साखरही मिसळू शकतो. कुकीज आणि पेस्ट्रीसोबत या कॉफीचा स्वाद घेण्याची मज्जाच निराळी असते.

५. मोचा चीनो

मोचा चीनो

कॅपेचीनो कॉफीमध्ये कोको पाउडर मिसळून मोच चीनो कॉफी बनवली जाते. या कॉफीमध्ये गार्निर्शिंगसाठी व्हीप्ड क्रीमचा वापर केला जातो.

 ६. आयरीश कॉफी

आयरीश कॉफी

आयरीश कॉफी ही सर्वाधीक लोकप्रिय कॉफी प्रकारांपैकी एक आहे. ही कॉफी बनवण्यासाठी व्हिस्की, एस्प्रेसो आणि साखरेचा वापर करतात.

७. इंडियन फिल्टर कॉफी

इंडियन फिल्टर कॉफी

दक्षिण भारतात फिल्टर कॉफीची निर्मिती झाल्याचे समजते. कॉफीच्या सुकलेल्या बियांपासून ही बनवली जाते. यामध्ये दुध आणि साखरही मिसळतात. इतरांपेक्षा ही कॉफी जास्त गोड असते.

८. व्हाइट कॉफी

व्हाइट कॉफी

हा कॉफी प्रकार मलेशियातून भारतात आला आहे. पाम तेलात कॉफी बीन्स मिसळून ही कॉफी बनवली जाते. दुध आणि साखर मिसळून ही कॉफी जास्त चवदार बनवली जाते .

First Published on: June 30, 2018 3:46 PM
Exit mobile version