Fridge Cleaning Tips : फ्रीजमधील व्हेजिटेबल ट्रे साफ करण्यासाठी वापरा या टीप्स

Fridge Cleaning Tips : फ्रीजमधील व्हेजिटेबल ट्रे साफ करण्यासाठी वापरा या टीप्स

केवळ उन्हाळाच नाही तर आजच्या युगात प्रत्येक ऋतूसाठी फ्रीजला खूप महत्त्व आले आहे. हवामानानुसार आपण त्याचे कूलिंग कमी-जास्त करत राहतो. तसे, आपण फ्रीजचा रोज पूर्ण वापर करतो, पण त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. फ्रीज स्वच्छ ठेवणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. फ्रीजरमध्ये ठेवलेली भाजीची टोपली तुम्ही काही सोप्या हॅकच्या मदतीने स्वच्छ करा.

फ्रीजची आतील बाजू कशी स्वच्छ करावी

गरम पाणी वापरा

सर्व सामान बाहेर काढल्यानंतर पाणी कोमट करुन घ्या आणि त्यासोबत एखादे स्वच्छ कापड घ्या.
कोमट पाण्यात हे कापड बुडवा आणि त्या कापडाने फ्रीज स्वच्छ करुन घ्या.
जिथे डाग जास्त खोल आहेत तिथे कापड वारंवार मारा, असे केल्याने फ्रीजची घाण कपड्यांवर येते.

फ्रिजला चमक येण्यासाठी लिक्विडचा वापर करा

गरम पाण्याने डाग निघण्यास मदत होते. त्यानंतर फ्रिज साफ करण्यासाठी तुम्ही लिक्विडचा देखील वापर करु शकता.
बाजारातून लिक्विड विकत घेण्यापेक्षा ते घरी बनवणे चांगले. यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा डिटर्जंट पावडर घ्या. या दोन गोष्टी मिक्स करून 1 कप पाण्यात टाका. आता तुमचे लिक्विड तयार होईल. आता हे लिक्विड एका स्प्रे बाटलीत भरा आणि फ्रिजच्या आत आणि बाहेर फवारणी करा. असे केल्याने फ्रिज चांगला स्वच्छ होतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

First Published on: March 21, 2024 6:28 PM
Exit mobile version