या प्रकारचे कपडे वापरल्याने होणार नाही उन्हाचा त्रास

या प्रकारचे कपडे वापरल्याने होणार नाही उन्हाचा त्रास

नुकताच उन्हाळा सुरु झाला असून सध्या हळूहळू तापमान देखील वाढत आहे. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे या दिवसात कोणते कपडे घालावे आणि कोणते कपडे घालू नये. खरं तर, उन्हाळ्यात कपडे निवडताना काही गोष्टींचा विचार अगदी सावधपणे करायला हवा. जेणेकरून उन्हाचे चटके लागणार नाहीत आणि तुम्ही स्टायलिश देखील दिसू शकता.

उन्हाळ्यात वापरा हे कपडे

उन्हाळ्यात कपडे परिधान करताना अतिशय सैल कपडे निवडा. जेवढं कमी फॅब्रिक तुमच्या अंगाला लागेल तेवढं कमी गरम होईल.

उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करावा. घट्ट, अंगाला चिकटणारे कपडे वापरु नयेत. सुती कपड्यांमध्ये घाम शोषून घेतला जाईल, असे कपडे वापरा.

उन्हाळ्यात कपडे निवडताना हलक्या रंगाचे कपडे घालावे. जास्त करून सफेद रंगाचे कपडे घाला. या दिवसांत काळ्या, लाल रंगाचा वापर अजिबात करू नये.

उन्हाळ्याच्या दिवसात भडक रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत. तसेच लाईट एब्सोर्ब करणार्‍या रंगाचे कपडे या दिवसांत नका घालू.

उन्हाळ्याच्या दिवसात सिल्क, सिन्थॅटिक आणि नायलॉनसारखे कपडे अजिबात वापरू नका. यामुळे गर्मी अधिक होते.

 


हेही वाचा :

Fashion Tips : बॅकलेस ब्लाउजसाठी या ब्रा आहेत परफेक्ट

First Published on: March 21, 2024 2:26 PM
Exit mobile version