जाणून घ्या उत्कटासनाबाबत

जाणून घ्या उत्कटासनाबाबत

जाणून घ्या उत्कटासनाबाबत

बऱ्याचदा अनेकांना संधीवात, हातांते सांधे दुखणे, पायांचे पंजे दुखणे अशी दुखणी सुरु असतात, अशावेळी उत्कटासन केल्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो. मात्र, हे आसन कसे करावे? त्याचे फायदे कोणते? हे आसन करताना कोणती काळजी घ्यावी? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

उत्कटासन करण्याची पद्धत

उत्कटासन करण्याची पद्धत दोन्ही पायांमध्ये एक फुटाएवढे अंतर असावे. पाठ ताठ आणि सरळ असावी. दोन्ही हात शरीरालगत बाजूला असावेत. आता हळुवारपणे पायांच्या टोकावर उभे राहावे, त्याचबरोबर दोन्ही हात खाद्यांच्या सरळ रेषेत आणावे आणि जसे खुर्चीवर बसतो अगदी तसे खाली यावे गुडघ्यातून पाय वाकवावा. काही सेकंद स्थिर रहावे. पाय वाकवून उभे राहावे पण, दोन्ही पाय हे टोकांवर असावे.

वेळ

हे आसन करताना पंधरा ते वीस काऊंटिंग करावे.
हे आसन दोन वेळा करावे.

उत्कटासनाचे फायदे

या आसनाने पायांना चांगलाच स्ट्रेच मिळतो.
मांडय़ाची जाडी कमी करण्यास हे आसन फायदेशीर आहे.
या आसनाच्या नित्य सरावामुळे हातांचे सांधे आणि पायांचे पंजे मजबूत होतात.
या आसनाने संधिवात बरा होण्यास मदत होते.

कोणत्या व्यक्तींने करायचे नाही

मासिक पाळीच्या वेळी हे आसन करू नये. गुडघा दुखत असेल किंवा चक्कर येत असेल तर हे आसन करू नये.

First Published on: May 9, 2020 6:26 AM
Exit mobile version