महिलांनो सतत टीव्ही बघितल्याने आरोग्य येईल धोक्यात

महिलांनो सतत टीव्ही बघितल्याने आरोग्य येईल धोक्यात

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मनोरंजनासाठी आपण टीव्ही बघतो. पण टीव्हीवर रोज आदळणाऱ्या मालिका आणि वेब सिरिजमुळे आता टिव्ही मनोरंजनापुरता मर्यादित न राहता बऱ्याचजणांना त्याच व्यसन लागलं आहे. यामुळे तासन् तास एकाच जागी बसणं वाढलय आणि शरीराची हालचाल करणच अनेकजण विसरले आहेत. परिणामी स्थूलपणाबरोबरच हृदयाशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी आणि मधुमेहासारखे आजारही वाढले आहेत. यावर तज्त्रांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार एकाच जागी ५ तासाहून अधिक काळ बसल्याने महिलांमध्ये वजन वाढण्याचे प्रकार वाढत असल्ायचे समोर आले आहे.

 

त्यामुळे सुस्तपणा कामाचा कंटाळा देखील महिलांमध्ये वाढू लागला आहे. त्याचबरोबर कम्प्युटरटरवर ५ तासाहून अधिक तास म्हणजे ११ तास बसणाऱ्यांनाही आरोग्याशी संबंधित तक्रारी सतावू लागल्या आहेत. त्यातही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

First Published on: December 12, 2022 6:11 PM
Exit mobile version