हळदीचा चहा घ्या आणि वजन घटवा

हळदीचा चहा घ्या आणि वजन घटवा

हळदीचा चहा

बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी चहा बंद करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकांना चहाची सवय लागलेली असते. त्यामुळे चहाची सवय सहजासहजी सुटणे शक्य नसते. अशावेळी जर तुम्ही हळदीच्या चहाचे सेवन केल्यास तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होईल. हळदीचे आरोग्यवर्धक फायदे असून हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण असतात. त्यामुळे हळदीच्या सेवनाने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि त्यामुळे वजन देखील कमी होते.

असा तयार करा चहा

साहित्य

हळदीचे चूर्ण
आलं
पाणी

कृती

हळदीचा चहा तयार करताना सर्वप्रथम एक ग्लास पाणी उकळत ठेवा. पाणी उळल्यानंतर त्यात हळद आणि आल्याची पेस्ट घाला. २ मिनीटांनी गॅस बंद करा. कोमट झाल्यानंतर या चहाचे सेवन करा.

First Published on: January 3, 2020 6:45 AM
Exit mobile version