प्रतिकारशक्ती कमी केव्हा होते ?

प्रतिकारशक्ती कमी केव्हा होते ?

रोगप्रतिकारक शक्ती

जास्त गंभीर असणे

ज्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो आणि जे लोक निखळ मनाने हसतात अशा लोकांच्या शरीरात स्ट्रोस हार्मोन नियंत्रित राहतो. याउलट जास्त गंभीर असणार्‍या लोकांसोबत असे होत नसल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. तसेच लोमा लिंडा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी वयस्कर लोकांवर केलेल्या एका संशोधनातून ज्या लोकांना एक तास आवडता व्हिडिओ पाहण्याची सवय असते त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत असते, असे आढळून आले आहे. गंभीर व्यक्तींनी आवडती विनोदी मालिका किंवा चित्रपट पाहावा आणि मनमोकळे हसावे. यामुळे तणावही कमी होईल.

अँटिबायोटिक्स

तज्ज्ञांच्या मते जे लोक अँटिबायोटिक्सवर अवलंबून असतात, त्यांच्या शरीरात सायटोकिन्सची पातळी कमी होत जाते. खरे म्हणजे हा प्रतिकारशक्तीचा हार्मोन मॅसेंजर आहे. हा दुबळा होताच शरीराची बाह्यसंसर्ग आणि हानिकारक जिवाणूंशी लढण्याची क्षमता दुबळी होत जाते. केवळ अँटिबायोटिक इन्फेक्शनने पीडित असल्याने अँटिबायोटिक्स घ्यावे. तसेच हा कोर्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण करावा.

पॅसिव्ह स्मोकिंग

तुम्हाला धूम्रपानाची सवय नाही; परंतु तुम्ही अप्रत्यक्षपणे सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येत असाल तरीही तुमची प्रतिकारशक्ती दुबळी होऊ शकते. हा पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होणारा दुष्परिणाम आहे. अशा स्थितीत दम्याचा झटका आणि विविध प्रकारची अ‍ॅलर्जी किंवा संसर्गाने पीडित असण्याची शक्यता वाढते. सुमारे 3000 पेक्षा जास्त नॉनस्मोकर म्हणजे धूम्रपान न करणार्‍या लोकांचा मृत्यू लंग कॅन्सरमुळे झाला होता, ही बाब अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून समोर आली आहे. तसेच तीन लाख मुले श्वसनाशी संबंधित संसर्गाने आजारी असल्याचेही उघड झाले होते. जर तुमच्या आजूबाजूला कुणीही धूम्रपान करत असेल तर तेथे कदापिही थांबू नये. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांना धूम्रपान न करण्याचा सल्ला द्यावा.

व्यायामाचा अभाव

एका संशोधनानुसार जे लोक नियमितपणे व्यायाम करत नाहीत ते लोक व्यायाम करणार्‍यांच्या तुलनेत जास्त आजारी पडतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, अशा स्थितीत व्यायाम न करणारे लोक पीडित होण्याचा धोका दुप्पट असतो. हे टाळण्यासाठी 30 मिनिटांचा एरोबिक व्यायाम करावा, कारण यामुळे पांढर्‍या रक्त पेशींच्या (डब्ल्यूबीसी) संख्येत वाढ होऊन प्रतिकारशक्तीही बळकट बनते.

कामाचा ताण

नोकरीची अनिश्चितता आणि अहोरात्र काम केल्याने होणारा मानसिक ताणही प्रतिकारशक्तीसाठी घातक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते तणावामुळे सेल्स पेशींची (या पेशी डब्ल्यूबीसी कुटुंबातीलच आहेत) कार्यप्रणाली निष्क्रिय होऊ लागते. इतर एका संशोधनानुसार जीवनसाथीच्या मृत्यूने पोहोचणार्‍या भावनात्मक आघातामुळे विधवा किंवा विधूर यांचे आरोग्यही पहिल्या वर्षी अत्यंत खराब असते. अशा स्थितीत योगासने आणि ध्यान साधना करावी, जेणेकरून मानसिक समाधान मिळू शकेल. तसेच कधीही एकटे राहू नये आणि सतत सामाजिक उपक्रमात स्वत:ला गुंतवून ठेवावे.

मित्रही आवश्यक

एका संशोधनानुसार कोणत्याही व्यक्तीचे घर, कार्यालय आणि समाजाशी जेवढा जास्त संपर्क किंवा जवळीकता असेल, त्या व्यक्तीची आजारी पडण्याची शक्यता तेवढीच कमी होते. 18 ते 55 वय असलेल्या सुमारे 276 लोकांवर हे संशोधन करण्यात आले. त्यातून वर सांगितल्यानुसार ज्या लोकांचा सहा किंवा त्यापेक्षा जास्त संपर्क आला ते लोक सर्दी-खोकला किंवा इतर साथीच्या रोगांपासून चार पट जास्त सुरक्षित राहत असल्याचे आढळून आले आहे.तुम्ही कितीही व्यग्र असाल तरीही सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे. तसेच मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहिल्यावर दूरध्वनी किंवा ई-मेल करावा.

First Published on: October 18, 2018 12:52 AM
Exit mobile version