Friday, May 17, 2024
घरमानिनीलग्नानंतर बदलतो मुलींचा स्वभाव, का होते चिडचिड?

लग्नानंतर बदलतो मुलींचा स्वभाव, का होते चिडचिड?

Subscribe

लग्न ही नवीन जीवनाची सुरुवात असते. लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघांच्याही आयुष्यात बदल होतात. पण तुलनेने मुलींच्या आयुष्यात जास्त बदल होतात. हे बदल शारीरिक आणि मानसिक दोन्ही असतात. नवीन घर, नवीन लोक, नवीन परंपरा मुलींना आत्मसात कराव्या लागतात. लग्न झाल्यानंतर स्त्रिया खूप आनंदी असतात. नवीन आयुष्याच्या प्रवासाविषयी त्या स्वप्नरंजन करू लागतात. परंतु लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्यात खूप बदल होतो.

मनस्थिती

लग्न हा पूर्णपणे लाईफ चेंजिग अनुभव आहे. लग्न झाल्यावर फक्त मुलीला घरच बदलावे लागत नाही, तर तिला घरात बरीच अॅडजस्टमेंट करावी लागते.

- Advertisement -

शारीरिक बदल

शारीरिक बदल तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात, नातेवाईक किंवा शेजारच्या घरात ही गोष्ट पाहिली असेलच की लग्नानंतर बहुतेक महिलांच्या दिसण्यातही फरक पडतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे लग्नानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. कारण, घर सांभाळताना आणि नवीन लोकांच्या आवडनीनिवडी जपताना त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.

ड्रेसिंग सेन्स बदलणं

ड्रेसिंग सेन्स बदलणं हा मुलींच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा खूप मोठा बदल आहे. ज्या मुली लग्नाआधी घरी शॉर्ट्स आणि जीन्स आणि स्कर्ट किंवा सलवार सूटमध्ये असायच्या, त्यांना लग्नानंतर दररोज साडी किंवा सलवार सूटमध्ये रहावं लागतं. याचं कारण म्हणजे आजही बहुतेक कुटुंबात सुनेच्या कपड्यांबाबत तिच जुनी टिपिकल विचारसरणी आहे. त्यामुळे मुलींना साडी किंवा सलवार सूट घालावे लागतात.

- Advertisement -

बालपण हरवतं

बालपण हरवतं कितीही मोठे झालो तरी आपल्या पालकांसाठी आपण नेहमी लहानच असतो. त्यामुळे लग्नानंतरही जेव्हा मुली त्यांच्या माहेरी जातात, तेव्हा त्यांचं वागणं काहीसं बालिश असतं. कारण त्यांचे लाड तिथे पुरवले जातात, शिवाय त्यांना हवं ते करण्याचं स्वातंत्र्य असतं. कोणतीही रोकटोक नसते. पण लग्नानंतर सासरी त्यांचा स्वभाव गंभीर होतो. कारण तिथे त्यांना जबाबदारीने वागावं लागतं. हे आहेत लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात येणारे महत्वाचे बदल.

का चिडचिड करतात महिला

एका स्ट़डीनुसार असे लक्षात आले आहे की, पुरुष आणि स्त्रीयांचे टेंपरामेंट हे संपूर्ण वेगळे असते. लग्नाबाबत त्यांचे वेगवेगळे इनोशन्स असू शकतात. त्यामुळे यावरुन जोडप्यांमध्ये वाद होतात. लग्नानंतर महिलांच्या खाण्या- पिण्याच्या सवय़ी आणि राहणीमान य़ातही फरक पडतो. त्यामुळे त्यांची चिडचिड होते.

- Advertisment -

Manini