हिवाळ्यात ‘ही’ फळे खा, फिट राहा

हिवाळ्यात ‘ही’ फळे खा, फिट राहा

प्रातिनिधिक फोटो

नोव्हेंबर महिना सुरू झाला की हिवाळा सुरू होतो. थंडीत भूक व तहान कमी लागते . कारण वातावरणातील बदलांचा शरीरावर परिणाम होतो. यामुळे या सिझनमध्ये जी फळे, भाज्या येतात त्यांचे सेवन करावे. कारण ती त्या त्या सीझनमध्ये शरीरासाठी आवश्यक असतात. आज आपण अशाच हिवाळ्यातील फळांबद्दल जाणून घेणार आहोत.

संत्र- हिवाळ्यात तहान लागत नाही. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे हिवाळ्यात संत्री आवर्जून खावीत. यात व्हिटामीन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते.संत्र्यामुळे त्वचाही तजेलदार होते. कोलॅस्ट्रॉल कमी होते.

स्ट्रॉबेरी- हिवाळ्यात स्ट्रॉबेरी बाजारात येते. स्ट्रॉबेरीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. त्याचबरोबर स्ट्रॉबेरीच्या सेवनाने त्वचाही तजेल होते. शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्याबरोबरच हृदयासाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे.

सिताफळ- सिताफळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. यात व्हिटामीन बी असल्याने पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात.

चिकू- आहारात व्हिटामीन ए महत्वाचे आहे. चिकूमध्ये व्हिटामीन ए चे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे चिकू खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. लहान मुलं आणि गर्भवती महिलांनी चिकू खाणे चांगले.

मोसंबी-मोसंबी या फळात संत्र्यासारखेच मुबलक व्हिटामीन सी असते. यामुळे संत्र्याला पर्याय म्हणून मोसंबी खाण्यास हरकत नाही. चवीला गोड असणाऱ्या मोसंबी मध्ये फायबर असते जे शरीराला महत्वाचे असते. मोसंबी आणि संत्र्यामुळे श्वसनाशी संबंधित विकार नियंत्रणात येतात.

तसेच यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असल्याने आजारी व्यक्तीस सफरचंद आणि मोसंबी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. संधीवाताचा त्रास असलेल्या व्यक्तीने मोसंबी खाल्याने त्रास कमी होतो. थंडीत अनेकजणांना संधीवाताचा त्रास होतो. यामुळे या सिझनमध्ये मोसंबी खावे.

 

 

First Published on: November 21, 2021 8:43 PM
Exit mobile version