महिलांनी फर्टिलिटीसाठी आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश

महिलांनी फर्टिलिटीसाठी आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश

जवळपास अनेक महिलांना आयुष्यात प्रेग्नेंसी संबंधित कोणत्याना कोणत्यातरी समस्येचा सामना करावा लागतो. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक महिलांना इनफर्टिलिटीचा देखील सामना करावा लागतो. परंतु या समस्येचे निवारण तुम्ही घरच्या घरी केवळ योग्य आहाराच्या मदतीने देखील घेऊ शकता. प्रेग्नेंसीचा विचार करत असलेल्या महिलांना योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं असतं. फर्टिलिटी वाढवण्यासाठी महिलांना सुरक्षित आणि पौष्टिक पदार्थांना आपल्या आहारात सहभागी करायला हवे.

महिलांनी फर्टिलिटीसाठी आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश

अंजीर

फर्टिलिटी वाढवण्यासाठी अंजीर सर्वात उत्तम मानले जाते. यामध्ये इंसुलिन कमी करण्याचे गुण असतात.

काजू


काजू शरिराला मजबूत बनवण्यासोबतच फर्टिलिटी वाढवण्यास देखील फायदेशीर आहे. काजूसोबतच तुम्ही डाळ, चने यांचा देखील सहभाग करु शकता.

डाळिंब


डाळिंबामध्ये व्हिटॅमीन सी, के आणि इतर अनेक पोषकत्त्व असतात. डाळिंब महिलांसोबतच पुरुषांच्या फर्टिलिटीसाठी देखील मदत करते.

गाईचे दूध

फर्टिलिटी वाढवण्यासोबकतच गाईचे दूध प्रेग्नेंसीमध्ये फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमीन ए, ई आणि डी देखील असते. ज्यामुळे आपले आरोग्य सुधारते.

दालचीनी


दालचीनी मसाल्याचा स्वाद वाढवण्याशिवाय फर्टिलिटीमध्ये देखील फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म देखील सुधारते.

First Published on: January 17, 2023 3:43 PM
Exit mobile version